विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघांनी कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे. तत्पूर्वी माजी भारतीय गोलंदाज अजित आगकर याने या सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ बाबत कुठलाही खुलासा केला गेला नाहीये. तसेच अनेक दिग्गजांनी आपली संभावित प्लेइंग ११ निवडल्याचे पाहायला मिळाले आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराट कोहलीसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असेल. अशातच माजी भारतीय गोलंदाज अजित आगरकर याने देखील आपले मत मांडले आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या गेल प्लॅन शो मध्ये बोलताना ३४९ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा अजित आगरकर म्हणाला, “वेगवान गोलंदाज या सामन्यात मोलाची भूमिका बजावणार आहेत. भारतीय संघाकडे सध्या विश्वातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. माझ्या मते, गेल्या काही वर्षात वेगवान गोलंदाजी हा भारतीय संघाचा मजबूत पक्ष राहिला आहे. जसप्रीत बुमराह असो किंवा मोहम्मद शमी, दोघेही माझ्यासाठी भारताच्या कसोटी संघातील पहिल्या क्रमांकाचे गोलंदाज आहेत. यासोबतच ईशांत शर्मा देखील आहे. हे सर्व उत्कृष्ट गोलंदाज आहेत.”
अजित आगरकरच्या मते, जर खेळपट्टीवर गवताचे प्रमाण जास्त असेल; तर भारतीय संघाने ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायला हवे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या तीन गोलंदाजांचे खेळणे निश्चित आहे. परंतु जर वेगवान गोलंदाजांना मदत मिळणारी खेळपट्टी असेलच तर चौथा गोलंदाज देखील खेळताना दिसून येऊ शकतो. त्यावेळी परिस्थिती काय असेल याचा अंदाज नाही. परंतु इंग्लंडमध्ये ड्युक चेंडू वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरतो. तुम्ही असा विचार करू शकत नाही की, जून महिना असल्यामुळे खेळपट्टी कोरडी असेल.”
कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडेत ६ धावा देत ५ विकेट्स घेणारा खेडेगावातील सुपरस्टार ‘सुनिल जोशी’
आरंभ है प्रचंड! पहिल्यावहिल्या कसोटी चॅम्पियनशीपसाठी ‘मिस्टर डिपेंडेबल’ दिसला घाम गाळताना
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’