भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याची गणना जगातील अव्वल फलंदाजांमध्ये केली जाते. शतक करण्यासाठी एक धाव कमी असो, दोन धावा कमी असो किंवा चार धावा कमी असो, ते शतक षटकार आणि चौकारानेच पूर्ण करण्याचा प्रयत्न सेहवागचा असायचा. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याच्या मते, सेहवाग हा तो खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामी फलंदाजाची व्याख्याच बदलून टाकली आहे. सेहवाग याने त्याच्या कारकीर्दीत ८५८६ धावा आणि वनडे क्रिकेटमध्ये ८२७३ धावा चोपल्या आहेत. दोन्ही क्रिकेट प्रकारात मिळून त्याच्या नावावर एकूण ३८ शतकांचा समावेश आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू असलेला विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याला त्याचा निरोप सामना मिळाला नव्हता. या गोष्टीचे दु:ख त्याला असल्याचे बोलले जाते.
माध्यमांशी बोलताना सेहवाग याने खुलासा केला की, त्याच्या कारकीर्दीत असा एक काळ आला होता, जेव्हा त्याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. ही गोष्ट सन २००८ सालची आहे. त्यावेळी एमएस धोनी (MS Dhoni) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे संघातून त्याला बाहेर केले होते. मात्र, त्याचे मनपरिवर्तन झाले आणि त्याने पुढेही खेळत राहण्याचा निर्णय घेतला. याचे संपूर्ण श्रेय तो माजी भारतीय सलामीवीर फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला देतो.
सेहवाग म्हणाला की, “सन २००८मध्ये आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये होतो आणि निवृत्तीचा प्रश्न माझ्या डोक्यात आला. मी कसोटी मालिकेत पुनरागमन केले होते. मी १५० धावा चोपल्या होत्या. दुसरीकडे, वनडे क्रिकेटमध्येही ३-४ सामन्यांमध्ये मी जास्त धावा करू शकलो. त्यावेळी एमएस धोनी याने मला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढले. यानंतर माझ्या डोक्यात वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार आला. मी विचार केला की, आता फक्त कसोटी क्रिकेटमध्येच खेळेल.”
“सचिन तेंडुलकर याने मला त्यावेळी रोखले. तो मला म्हणाला की, ‘हा तुझ्या कारकीर्दीतील वाईट काळ आहे. वाट पाहा. या दौऱ्यानंतर घरी जा आणि खोलात जाऊन विचार कर मग निर्णय घे की, तुला पुढचे पाऊल काय उचलायचे आहे.’ सुदैवाने मी त्यावेळी माझ्या निवृत्तीची घोषणा केली नाही,” असेही पुढे बोलताना सेहवाग म्हणाला.
त्यानंतर ३ वर्षांनी सेहवाग २०११ विश्वचषकात झळकला. भारतीय संघाने या किताबावर आपले नाव कोरले. सेहवाग त्या संघातील महत्त्वाचा भाग होता. त्याने बांगलादेशविरुद्ध स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात शानदार शतक साजरे केले होते. त्या विश्वचषकात सेहवाग याने ८ सामन्यात फलंदाजी करताना ४७.५०च्या सरासरीने ३८० धावा चोपल्या. या धावा करताना त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका- भारत मालिकेसाठी दोन्ही संघ ‘या’ दिवशी होणार मैदानात दाखल; बीसीसीआयने दिली माहिती
बिहारमधला सलूनवाला पंड्याचा जबरा फॅन; जिंकण्याच्या खुशीत स्वत:चं आणि दुकानाचं घातलं बारसं
क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी बेईमानी करणारा हॅन्सी क्रोनिए, वाचा काय केला होता राडा?