इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेतील चौथा सामना दुबई येथे रविवारी (दि. 15 जानेवारी) डेझर्ट वायपर्स विरुद्ध शारजाह वॉरिअर्स संघात पार पडला. या सामन्यात डेझर्ट संघाने शारजाहला 7 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यादरम्यान डेझर्ट संघाचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल याने फेकलेला चेंडू चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग यानेही या चेंडूवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
झाले असे की, शेल्डन कॉट्रेल (Sheldon Cottrell) याने सामन्यादरम्यान एक फुलटॉस चेंडू टाकला होता. हा चेंडू खेळपट्टीपासून दूर जात होता. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या टॉम कोहलर- कॅडमोर (Tom Kohler- Cadmore) याने जोरदार शॉट मारत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. कदाचित कॉट्रेल त्या चेंडूवर काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला ते शक्य झाले नाही, आणि चेंडू फुलटॉस फेकला गेला.
सेहवागची प्रतिक्रिया
यावर आता भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने या चेंडूला ‘भेटवस्तू’ (Gift) असे म्हटले आहे. त्याने समालोचन करताना म्हटले की, “हल्ली भेटवस्तू अशा भेटत आहेत, ज्या मोजता येणार नाहीत. आमच्या काळातही अशा भेटवस्तू मिळायला पाहिजे होत्या.”
Dead Ball?
No Ball?Admin right now =🤔😕🤯#DVvSW #HarBallBawaal pic.twitter.com/UQgQw8eJXX
— Zee Cricket (@ilt20onzee) January 15, 2023
दुर्दैवाने कोहलरचा प्रयत्न व्यर्थ ठरला. कारण पंचांनी या चेंडूला डेड बॉल घोषित केले. एमसीसी कायद्याच्या 21.8नुसार, “जर चेंडू खेळपट्टीपासून इतका दूर आहे की, फलंदाजाला चेंडू मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी खेळपट्टी सोडण्याची गरज पडली, तर पंच त्या चेंडूला डेड घोषित करून नो बॉलचे संकेत देतील.”
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर शारजाह वॉरिअर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 148 धावा चोपल्या होत्या. शारजाहकडून जो डेनली याने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. त्याने त्याच्या डावात 33 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद नबी यानेही 23 चेंडूत नाबाद 34 धावांचे योगदान दिले.
डेझर्ट वायपर्स संघाने ऍलेक्स हेल्स (Alex Hales) याच्या अर्धशतकाच्या मदतीने 17व्या षटकातच आव्हान गाठले. हेल्सने 52 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 83 धावा कुटल्या. याव्यतिरिक्त सॅम बिलिंग्स यानेही 49 चेंडूंचे योगदान दिले होते. (former indian cricketer virender sehwag s hilarious reaction on sheldon cottrell s bizarre delivery in ilt20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानावरही फटकेबाजी; ‘स्टायलिश’ फलंदाजीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश