२० षटकांच्या जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी तर मिळतेच. पण काही खेळाडूंना आयपीएलमुळे राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्याचेही आपण पाहिले आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हे याचे उत्तम उदाहरण आहे. आता मुंबईच्या एका धुरंधरलाही भारतीय संघात स्थान मिळावे, अशी मागणी माजी भारतीय क्रिकेटपटू करु लागले आहेत.
आयपीएल २०२०चा २०वा सामना मंगळवारी (६ ऑक्टोबर) अबु धाबी येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या या विजयामध्ये मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याने महत्त्वाचे योगदान दिले. त्याने मुंबईकडून फलंदाजी करताना नाबाद राहत ४७ चेंडूत ७९ धावा केल्या. यात त्याच्या ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
सूर्यकुमारच्या या चमकदार खेळीनंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठानने म्हटले की, “जर आताही सूर्यकुमारला भारतीय संघात जागा मिळाली नाही. तर मला खूप दुख: होईल. तो एक गजब खेळाडू आहे.”
इरफानव्यतिरिक्त हरभजन सिंगनेही मजशीर ट्विट करत लिहिले की, “सूर्यकुमार हा मीठी छुरी आहे.” तर प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने लिहिले की, “सूर्यकुमार यादव भारतीय टी२० संघात असेल.” एवढेच नव्हे तर मास्टर ब्सास्टर सचिन तेंडूलकरनेही ट्विट केले की, “सूर्यकुमार खूप विशेष आणि खतरनाक खेळाडू आहे. तो खेळपट्टीच्या चारी दिशांना फटके मारतो.”
It will be very disappointing if @surya_14kumar doesn’t find a place in the Indian team with this kind a form… #wattaplayer
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 6, 2020
Surya Kumar meethi churi ???? @surya_14kumar well played
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 6, 2020
Surya Kumar Yadav for Indian T20 Team ???? #MI
— Aakash Chopra (@cricketaakash) October 6, 2020
.@surya_14kumar is special and very dangerous because he can play on all sides of the wicket.#MIvRR #IPL2020
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 6, 2020
उजव्या हाताचा फलंदाज सूर्यकुमार हा आयपीएलच्या तेराव्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. राजस्थानविरुद्ध त्याने केलेल्या ७९ धावा ही त्याच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ठरली आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये एकूण ९१ सामने खेळत ८ अर्धशतकांच्या मदतीने १७२४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमुळे ‘या’ मोठ्या स्पर्धेत खेळू शकणार नाहीत ऑस्ट्रेलियन खेळाडू
‘या’ आयएसएल संघाने सुरु केला सराव
IPL 2020: आज कोलकाता-चेन्नई येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
ट्रेंडिंग लेख-
२००३ विश्वचषकात ७ ओव्हरमध्ये ६७ धावा ते २०११ ला ३ मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा आज बड्डे
टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा आकडा पार करणारे ३ भारतीय क्रिकेटर






