क्रिकेट विश्वात आज भरपूर खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक गोलंदाज आहेत, ज्यांनी फलंदाजांना पापड टाकण्यास भाग पाडले. कोणत्याही फॉरमॅटमध्ये मेडन ओव्हर टाकल्याने गोलंदाजांना वेगळा आत्मविश्वास मिळतो. पण एखाद्या गोलंदाजाने लागोपाठ 21 मेडन ओव्हर्स टाकल्या, असे कोणी म्हणत असेल, तर अशा रेकाॅर्डवर विश्वास ठेवणे कुणालाही कठीण जाईल. या बातमीद्वारे आपण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कंजूष गोलंदाजाबद्दल जाणून घेऊया, ज्याच्यासमोर फलंदाज धावांची भीक मागताना दिसत होते.
भारतीय क्रिकेटपटू बापू नाडकर्णी (Bapu Nadkarni) यांचे नाव कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लक्षात ठेवले जाते. हा अविश्वसनीय रेकाॅर्ड त्याच्या नावावर आहे. त्याने सलग 121 चेंडूंवर एकेरी धाव घेण्यासाठी फलंदाजांना तळमळायला लावले. नाडकर्णी यांचा हा रेकाॅर्ड गेली 60 वर्षे कायम आहे. 1964 साली त्यांनी हा पराक्रम करून इंग्लंडसमोर चमत्कार घडवला.
1964 मध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होता. बापू हा डावखुरा फिरकी गोलंदाज होता आणि त्याच्यासमोर इंग्लिश फलंदाजांना धावांची भीक मागावी लागली. मद्रासचे कॉर्पोरेशन स्टेडियम, चेन्नई त्यांच्या रेकाॅर्डचे साक्षीदार ठरले. कसोटी सामन्यात त्याने एकामागून एक 121 चेंडू टाकले, ज्यावर एकही धाव झाली नाही. बापूने एकूण 32 षटके टाकली होती ज्यात 27 मेडन होत्या तर 21 सलग मेडन होत्या. बापूंनी 32 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 5 धावा दिल्या.
भारतासाठी बापूची कारकिर्द चमकदार होती. त्याने 47 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने 9,165 चेंडू टाकले, ज्यामध्ये केवळ 2,559 धावा दिल्या. त्याच्या नावावर 88 विकेट्स आहेत. त्याने प्रति षटक 1.67 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे बापू नेटमध्ये नाणे ठेवून गोलंदाजीचा सराव करत असत, त्यामुळे त्याची गोलंदाजी अचूक होती.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहली घेणार निवृत्ती? RCBच्या माजी दिग्गजाने दिली प्रतिक्रिया
गोलंदाजी तर सोडाच, फलंदाजीतही धुमाकूळ घालतोय भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू
नाथन स्मिथ बनला ‘सुपरमॅन’ हवेत उडत घेतला अविश्वसनीय झेल! पाहा VIDEO