भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अनेक रेकाॅर्ड्स त्याच्या नावावर केले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) त्याची तुलना केली जाते. एवढंच नाही तर कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरचा 49 शतकांचा रेकाॅर्ड मोडीत काढला आणि 50 शतक झळकावले आहेत. तत्पूर्वी कोहलीच्या यशस्वी होण्यावर माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) मोठा खुलासा केला आहे.
विराट कोहली हा निःसंशयपणे क्रिकेटमधील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने भारतासाठी अनेक मॅच विनिंग सामने खेळले आहेत. तत्पूर्वी कोहली एकदा वेस्ट इंडिजमध्ये होता आणि त्याच्या कामगिरीबद्दल खूप काळजीत होता. तेव्हा हरभजनने त्याला सांगितले होते की, जर तो 10 हजार धावा करू शकला नाही तर त्याला स्वतःची लाज वाटेल. स्वत: हरभजनने एका पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला आहे.
एका पॉडकास्टमध्ये हरभजनने खुलासा केला की कोहलीच्या पहिल्या कसोटी मालिकेनंतर त्याचा स्वत:वरचा आत्मविश्वास कमी झाला होता. हरभजन म्हणाला, “मी तुम्हाला त्याच्या कसोटी क्रिकेटबद्दल काही सांगेन, तर सुरुवातीला आम्ही वेस्ट इंडिजमध्ये होतो. त्या दौऱ्यावर फिडेल एडवर्ड्सने (वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज) त्याला खूप त्रास दिला. त्याला कदाचित एलबीडब्लू किंवा शॉर्ट बॉलवर बाद केले होते. तो पुन्हा पुन्हा बाद होत होता, त्यामुळे तो खूप निराश झाला होता.”
पुढे बोलताना हरभजन म्हणाला, “विराट स्वतःवरच शंका घेत होता, त्याने विचारले ‘मी चांगला आहे का?’ मी त्याला म्हणालो, ‘जर तू 10 हजार धावा करू शकला नाहीस, तर तुला लाज वाटेल. तुमच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याची क्षमता आहे आणि जर तुम्ही धावा केल्या नाहीत तर ती तुमची चूक असेल. पण त्यानंतर कोहलीने जे केले ते सर्वांपेक्षा वेगळे आहे.”
कोहलीच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 113 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 49.15च्या सरासरीने 8,848 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 55.56 राहिला आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 30 अर्धशतके आणि 29 शतके आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमी किती श्रीमंत आहे? वाढदिवसादिनी जाणून घ्या एकूण संपत्ती
“आता बदला घेण्याची…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य
बांग्लादेशच्या मालिका विजयांनतर WTC गुणतालिकेत फेरबदल; भारताला राहावं लागणार सावध!