नुकतीच भारत-ऑस्ट्रेलिया संघातील बाॅर्डर-गावसकर मालिका संपली. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 असा पराभव केला. या संपूर्ण मालिकेत भारताची फलंदाजी फ्लाॅप ठरताना दिसली. दरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट देखील या मालिकेत शांत राहिली. त्याने या मालिकेत केवळ 1 शतक झळकावले. कोहलीने 5 सामन्यात केवळ 190 धावा केल्या. त्यावर आता भारताचा माजी खेळाडू इरफान पठानने (Irfan Pathan) मोठे वक्तव्य केले आहे.
इरफान पठाणने विराट कोहलीच्या भारतीय संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की, तो देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही किंवा त्याच्या तांत्रिक त्रुटी सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतले नाहीत. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या संपूर्ण मालिकेत विराट, रोहित खराब फॉर्ममध्ये होते. विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार बाद झाला.
इरफान पठाण (Irfan Pathan) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “सुपरस्टार संस्कृती संपली पाहिजे, संघ संस्कृतीची गरज आहे. तुम्हाला तुमची आणि तुमच्या संघाची कामगिरी सुधरावी लागेल. या मालिकेपूर्वी सामने झाले होते आणि त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी होती पण तो खेळला नाही. ही संस्कृती बदलली पाहिजे.”
इरफान पठानने असेही सांगितले की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) गरज नसताना रणजी ट्राॅफी खेळला कारण त्याला खेळपट्टीवर 4 किंवा 5 दिवस घालवायचे होते. तो म्हणाला, “विराट कोहली शेवटचा देशांतर्गत क्रिकेट कधी खेळला होता? एक दशकापूर्वी. कोहलीची जागा युवा खेळाडूला दिली पाहिजे, कारण गेल्या 5 वर्षांत पहिल्या डावात त्याची सरासरी 30 पेक्षा कमी आहे.”
शेवटी बोलताना इरफान पठाण म्हणाला, “2024 मध्ये पहिल्या डावात विराट कोहलीची सरासरी 15 होती. गेल्या 5 वर्षांत तीसही नाही. असे वरिष्ठ भारतीय संघात असावेत का? त्याऐवजी 25 वर्षांच्या तरूणाला संधी द्यायला हवी. तो 30ची सरासरी तरी नक्कीच देईल. हे संघाबद्दल आहे, व्यक्तीबद्दल नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनी कसोटी ठरली ऐतिहासिक, या मैदानावर झाले 3 मोठे रेकाॅर्ड्स
रोहित शर्मा, विराट कोहलीची कसोटी कारकिर्द धोक्यात? पाहा आकडेवारी
IND vs AUS; विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला, “भारतासारख्या संघाला…”