भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर (Vikram Rathour) यांनी संघाचा टी20 विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) खूप कौतुक केलं आहे. त्यांनी रोहितला एक कर्णधार म्हणून वर्णन केले ज्याला केवळ खेळातील छोट्या गोष्टीच कळत नाहीत तर खेळाडूंशीही त्याचा खोल संबंध आहे. रोहित शर्माची नेतृत्वशैली आणि त्याची सकारात्मक विचारसरणी त्याला उत्कृष्ट कर्णधार बनवते, असे राठोड यांचे मत आहे.
विक्रम राठोडने ((Vikram Rathour)) एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जरी रोहित नाणेफेकीच्या वेळी फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याचा निर्णय विसरला किंवा संघाच्या बसमध्ये त्याचा फोन, आयपॅड विसरत असला, तरीही त्याची रणनीती आणि गेम त्याच्या मनात कायम असतो. रोहित त्याच्या नियोजनात निष्णात आहे आणि एक हुशार कर्णधार आहे. मी कधीही असा कर्णधार पाहिला नाही जो संघाच्या बैठकांमध्ये आणि रणनीतींमध्ये इतका खोलवर गुंतलेला असेल.”
पुढे बोलताना राठोर म्हणाले की, “रोहित हा खेळाडूंचा कर्णधार आहे. तो खेळाडूंसोबत बराच वेळ घालवतो, त्यांचे विचार समजून घेतो आणि संघाच्या रणनीतीमध्ये त्यांचे योगदान समाविष्ट करतो.” विक्रम राठोरने टी20 विश्वचषक 2024च्या फायनलमधील एक मनोरंजक किस्साही सांगितला. त्यांनी सांगितले की, रोहितने जसप्रीत बुमराहला डेथ ओव्हर्सपूर्वी गोलंदाजी करण्यासाठी कसे पाठवले, ज्यामुळे सामना भारताच्या बाजूने वळला. राठोड म्हणाले, “रोहितची ही रणनीती आश्चर्यकारक होती, परंतु या निर्णयामुळे आम्हाला सामना जिंकता आला.”
रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा 13 वर्षांनंतरचा आयसीसी ट्राॅफीचा दुष्काळ संपवला. भारतानं 2024च्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत ट्राॅफीवर नाव कोरले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चमकदार कामगिरी करत आहे. 2022च्या टी20 विश्वचषकात देखील भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, तर 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात देखील रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ फायनलमध्ये पोहचला होता, त्यावेळी देखील भारताच्या हाती निराशाच लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आवडता विरोधी संघ कोणता मुंबई इंडियन्स की कोलकाता? कोहलीनं दिलं मजेशीर प्रत्युत्तर
बाॅर्डर गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाने दिला भारताला इशारा…!
ईशान किशनचा जोरदार कमबॅक! शेवटच्या ओव्हरमध्ये तुफानी षटकार मारत मिळवून दिला विजय