भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची रंगत अखेरच्या दिवसापर्यंत पोहोचली आहे. इंग्लंडने यजमान भारतासमोर विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ९० षटकात ३८१ धावा बनवाव्या लागतील.
तत्पूर्वी, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्स याला पायचित करत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने कसोटीतील ३०० बळी पूर्ण केले. त्यानंतर त्याच्या संघ सहकाऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ईशांत शर्माला या खास कामगिरीसाठी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या.
ईशांतने पूर्ण केले ३०० कसोटी बळी
आपला ९८ वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत असलेल्या भारताच्या ईशांत शर्माने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात डॅनियल लॉरेन्सला पायचित पकडत आपला ३०० वा कसोटी बळी मिळवला. तीनशे कसोटी बळी घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे. त्याच्याआधी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, आर. अश्र्विन व झहीर खान यांनी भारतासाठी ३०० बळी मिळवले आहेत.
दिग्गजांनी केले अभिनंदन
ईशांतच्या या विशेष कामगिरीनंतर भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवरून त्याला शुभेच्छा दिल्या. भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने ट्विट करत म्हटले, “या ३०० बळींच्या खास कामगिरीसाठी तुझे अभिनंदन. तू भारतासाठी पडद्यामागचा नायक ठरला आहे.”
Well done @ImIshant on your big achievement of taking 300 test wickets. You have been a silent hero for our team India.
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 8, 2021
हरभजनने खास अंदाजात ईशांतचे अभिनंदन करताना लिहिले, “शाबास लंबू! तुला आणखी बळींसाठी शुभेच्छा.”
Sabash Lambu @ImIshant wish you many more wickets #300
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 8, 2021
भारताचा माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण याने म्हटले, “खास कामगिरी ईशांत, ३०० कसोटी बळी घेणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज बनल्याबद्दल तुझे अभिनंदन. कायम तुझी मेहनत व शैली आम्हाला आवडते. या मानाचा तू हकदार आहेस.”
What an achievement @ImIshant Congratulations on becoming the third Indian pacer to reach the 300-wicket milestone in Tests. Always admired your work ethic and commitment towards the game especially this format. And you thoroughly deserve this rich reward. #INDvsENG pic.twitter.com/kWwCN0zN47
— VVS Laxman (@VVSLaxman281) February 8, 2021
मोहम्मद कैफने लिहीले, “त्याने कधी हार मानली नाहीस, कधी तक्रार केली नाही, उत्साहाची काही कमी नाही दाखवली. पडद्यामागचा नायक. त्याच्या या कामगिरीसाठी उभे राहून टाळ्या वाजवा. देशाने या सैनिकाला सलाम करावा.”
He never gives up, he never complains, he never lacks in intensity. Ishant Sharma is India's most unassuming, unsung champion. Please stand up and applaud his 300 Test wickets. Nation needs to acknowledge and salute this soldier
— Mohammad Kaif (@MohammadKaif) February 8, 2021
याव्यतिरिक्त सुरेश रैना, शिखर धवन या क्रिकेटपटूंनी देखील ईशांतचे अभिनंदन केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
यष्टीक्षणावरून रिषभ पंतवर माजी भारतीय खेळाडूची टीका
अनेक चढ-उतारांनी भरलेलं आहे मोहम्मद अझरुद्दीनचं आयुष्य, वाचा सविस्तर
अनुष्काने बर्प क्लोथसोबत फोटो अपलोड करताच हार्दिक पंड्याची मजेशीर प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाला