टी20 विश्वचषक 2022ची गुणतालिका पाहून समजते की, भारतीय संघाने या स्पर्धेत काय कामगिरी केली आहे. भारताच्या शानदार कामगिरी करत या स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला स्थान देण्यात आले. मात्र, कार्तिक मागील काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे अनेकांनी त्याच्या जागी रिषभ पंत याला संघात खेळवण्याचा सल्ला दिला आहे. अशात भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज हरभजन सिंग याने कार्तिकवर टीका करणाऱ्यांसह दिग्गज खेळाडूंवर निशाणा साधला आहे.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जेव्हा दुखापतग्रस्त झाला, तेव्हा मी म्हणालो होतो की, रिषभ पंत (Rishabh Pant) याला खेळवा. जर फिट असेल, तर तुम्ही कार्तिकला खेळवा. तुम्ही त्याला संघात यासाठी घेतलं होतं, कारण तो सर्वोत्तम फिनिशर आहे. तसेच, तुम्ही पंतला तिथे खेळवणार नाहीत, जिथे कार्तिक फलंदाजी करत आहे.”
यानंतर हरभजनने संघातील फॉर्मात नसलेल्या खेळाडूंवर निशाणाही साधला. तो म्हणाला की, “काही खेळाडू असे आहेत, जे अपयशी ठरले आहेत. मात्र, ते दिग्गज आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल बोलत नाहीत. दिनेश कार्तिक जिथे फलंदाजी करतो, ते सर्वात कठीण काम असते. युवराज सिंग आणि एमएस धोनी यांची जेवढी प्रशंसा कराल तितकी कमी आहे. त्यांच्यानंतर जर कोणत्या फिनिशरकडे लक्ष जाते, तर तो हार्दिक पंड्या आहे.”
पुढे बोलताना हरभजन म्हणाला की, “जर कार्तिकला संधी मिळालीये, तर त्याला जरा संधी देऊन टाका. कार्तिकला 3 सामन्यांतच फ्लॉप म्हटले नाही पाहिजे. त्याने खूप मेहनत घेतली आहे. धावाही करून आला आहे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. वरच्या फळीतील सर्वांना समर्थन मिळत आहे, तर खालच्या फळीतील खेळाडूंनाही मिळाले पाहिजे.”
खरं तर, दिनेश कार्तिकने टी20 विश्वचषक 2022मधील 3 सामन्यात 22 चेंडूत 14 धावा चोपल्या आहेत. दुसरीकडे, त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात
टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर पाँटिंगचा सवाल; म्हणाला, ‘पंतला…’