---Advertisement---

रमणला घरचा रस्ता तर पोवार प्रशिक्षकपदी, गांगुलीला सणसणीत पत्र लिहत केले ‘गंभीर आरोप’; होणार मोठा वाद!

On: शनिवार, मे 15, 2021 12:38 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची महिला भारतीय संघासाठीची प्रशिक्षक शोध मोहिम पार पडली आहे. भारतीय महिला संघाचे जुने प्रशिक्षक डब्ल्यू रमण यांना हटवून प्रशिक्षकपदी रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोवार हे पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.

भारतीय महिला संघाला टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवणाऱ्या रमण यांच्याऐवजी पोवार यांची प्रशिक्षकपद निवड केल्याने मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात रमण यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला पत्र (ईमेल) सणसणीत आरोप केल्याचे समजत आहे. संघातील खेळाडूंमधील स्वकेंद्री संस्कृती बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे. यामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, रमण यांनी पत्रात लिहिले आहे की, “मी नेहमी कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त संघाला महत्त्व देतो. मला भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूवर विश्वास आहे. कोणताही व्यक्ती इतका स्वकेंद्रित होऊ शकत नाही. जर संघातील संस्कृतीबद्दल एक खेळाडू म्हणून आम्हाला वाईट वाटत असेल तर बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गांगुलीने स्वत हा प्रश्न सोडवावा”

याबरोबरच रमण यांनी भारतीय महिला संघातील खेळाडूंचे वर्तण आणि त्यांच्यातील गर्विष्ठ स्वभावाबद्दलही पत्रात तक्रार केली आहे.

का होऊ मोठा शकतो वाद?
रमण यांनी गांगुलीला लिहिलेल्या पत्रानंतर मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, संघातील खेळाडूंशी मतभेद झाल्यास नेहमी प्रशिक्षकाला बलिदान द्यावे लागते. यापुर्वी मिताली राज आणि रमेश पोवार यांच्या वादावेळी असेच काहीसे घडले होते. त्यावेळी पोवार यांना प्रशिक्षकपदावरुन दूर करण्यात आले होते.

असे असले तरीही रमण यांनी त्यांच्या पत्रात कोणत्या खेळाडूचे नाव घेतलेले नाही. त्यांनी केवळ संघातील स्टार संस्कृतीबद्दल लिहिले आहे.

दुसऱ्यांदा पोवार प्रशिक्षकपदी
पोवार हे पुन्हा एकदा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले असल्याची घोषणा गुरुवारी (१३ मे) करण्यात आली होती. पोवार यांनी दुसऱ्यांदा प्रशिक्षकपद मिळवताना डब्ल्यूव्ही रमण, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममता माबेन, हेमलता कला आणि देविका वैद्य या उमेदवारांना मागे टाकले आहे.

पोवार यांच्यापूर्वी डब्ल्यूव्ही रमण हे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक होते. पण त्यांचा करार यावर्षी संपला. त्यानंतर बीसीसीआयने या पदासाठी इच्छूक उमेदवारांना अर्ज पाठवण्याची जाहीरात केली होती. त्यानंतर एकूण ३५ अर्ज बीसीसीआयकडे आले होते. त्यातील ८ जणांची अंतिम निवड करण्यात आली होती. या ८ जणांची मुलाखत मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांचा समावेश असणाऱ्या सल्लागार समितीने घेतल्या. त्यानंतर गुरुवारी पोवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘जास्तीच बोट ऋतिककडे आहे, पण काड्या..’ विराटवर निशाणा साधणाऱ्या वॉनला भारतीय दिग्गजाची सणसणीत चपराक

सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?

‘पृथ्वी शॉवर दुर्लक्ष करणं बर नव्हे, तो विरेंद्र सेहवागसारखा फलंदाज आहे,’ माजी निवडकर्त्याचा पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---