ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबत बांधली लग्नगाठ? माजी आयपीएल अध्यक्षाने खुद्द केलाय उलगडा

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींचे सुष्मिता सेनसोबत लग्न? खुद्द सोशल मीडियाद्वारे सांगितले सत्य

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी गुरुवारी (१४ जुलै) क्रिकेटप्रेमी आणि बॉलिवूड चाहत्यांना चकित करणारे वृत्त दिले आहे. ललित मोदी मिस यूनिव्हर्स आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांचे लग्न झाले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. ललित मोदींनी स्वत: सोशल मीडियाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. 

सुरुवातीला ललित मोदींनी एक ट्वीट केले होते, ज्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागला. ललित मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये सुष्मिता सेनला ‘बेटर-हाफ’ म्हटले होते. ज्याचा सरळ सरळ अर्थ होतो की, त्या दोघांनी विवाह केला आहे. ललित मोदींच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत आपले लग्न झाले नसून ते फक्त सुष्मिता सेनला डेट करत आहेत.

“मालदीवमध्ये ट्रीप झाल्यानंतर लंडनला कुटुंबांसह परतलो आहे, माझी बेटर हाफ सुष्मिता सेनचा उल्लेख कसा टाळायचा. एक नवीन सुरुवात, एक नवीन आयुष्य, अमाप आनंद होतोय”, असं ट्वीट करताना ललित मोदींनी अनेक प्रेमळ इमोजीही जोडल्या आहेत. तसेच अद्याप दोघांचे लग्न झाले नसल्याचेही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन रोहमॉन शॉलसोबत डेटिंग करत होती. १५ वर्षांनी तरुण रोहमॉनसोबत तिचं रिलेशनशीप काही दिवसांपूर्वी संपुष्टात आले. त्यानंतर सुष्मिताने चक्क ललित मोदीसोबत संसार थाटल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे ललित मोदीचेंही लग्न झाले असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनल होते. १७ ऑक्टोबर १९९१ ला त्यांनी लग्न केले होते. मीनल ललित मोदींपेक्षा ९ वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांना करीमा नावाची मुलगीही आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

लॉर्ड्स वनडे| युझवेंद्र चहलच्या फिरकीपुढे इंग्लंड बेहाल, भारताला विजयासाठी २४७ धावांचे आव्हान

बलाढ्य इंग्लंडच्या त्रिकुटावर भारी पडला चहल, टीम इंडियाला मिळून दिल्या महत्वाच्या विकेट्स

WIvsIND | बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर वेगवान गोलंदाजीचा लिडर, अर्शदीप-आवेशही डागणार तोफा

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.