आशिया चषक 2023 स्पर्धेबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, या स्पर्धेबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाहीये. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले आहे की, आशिया चषक 2023साठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआयच्या या पवित्र्यानंतर आशिया चषक इतर ठिकाणी हलवला जाऊ शकतो. मात्र, पीसीबी पाकिस्तानमध्येच आशिया चषकाचे आयोजन व्हावे, यावर अडून बसला आहे. अशात पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे.
‘अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी केलाय पाकिस्तान दौरा’
शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न असेल, तर आमच्याकडे अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी दौरा केला आहे. आम्हालाही भारतात सुरक्षेची भीती वाटत होती. मात्र, जर दोन्ही देशांच्या सरकारांकडून परवानगी मिळाली, तर दौरा होईल.” यानंतर आफ्रिदीने मजेशीर अंदाजात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करत म्हटले की, “मोदी साहेब क्रिकेट होऊ द्या.”
‘बीसीसीआय मजबूत बोर्ड’
शाहिद आफ्रिदी याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “जर आम्हाला कुणाशीही मैत्री करायची असेल आणि त्यांना जर आमच्याशी बोलायचंच नसेल, तर त्यात आम्ही काय करू शकतो? यामध्ये काहीच शंका नाही की, बीसीसीआय मजबूत बोर्ड आहे. जेव्हा तुम्ही मजबूत असता, तेव्हा तुमच्यावर अधिक जबाबदारी असते. तुम्ही अधिक शत्रू बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला मित्र बनवण्याची गरज आहे. अधिक मित्र बनवून तुम्ही मजबूत बनता.”
पाकिस्तान कमजोर आहे?
पाकिस्तान कमकुवत आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “पीसीबीला मी कमकुवत म्हणणार नाही, पण समोरूनही प्रतिक्रिया यावी. मी तुमच्यासोबत मैत्री करू इच्छित असेल, आणि तुम्हाला माझ्यासोबत मैत्रीच करू वाटत नसेल, तर मी काय करू?”
सन 2005च्या दौऱ्याची आठवण
आफ्रिदीने सन 2005मध्ये पाकिस्तान येथे झालेल्या मालिकेची आठवण करून दिली. तो म्हणाला की, “त्यावेळी मोठ्या माध्यमांचे लोक आले होते. भज्जी, युवी आणि इतर खेळाडूही बाहेरही जायचे आणि काही विकतही घ्यायचे. ते रेस्टॉरंटमध्ये जायचे, तेव्हा त्यांच्याकडून कुणीही पैसे घेत नव्हते. हेच दोन्ही देशांमधील प्रेम आहे.”
अशात आशिय चषक 2023 स्पर्धा कुठे खेळवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (former pak cricketer shahid afridi request to indian pm narendra modi to let the cricket happened between india and pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ आहेत IPLमधील सर्वात दुर्लक्षित केले गेलेले दोन भारतीय खेळाडू, विश्वास बसणे कठीण; कुंबळेचा खुलासा
ब्रेकिंग! वनडे मालिकेतून वाईट बातमी, बलाढ्य संघाचा कर्णधार दुखापतग्रस्त, ‘या’ खेळाडूकडे नेतृत्व