पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज इंजमाम उल हक यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ह्रदयविराकाराचा झटका आला आहे आणि दवाखान्यात दाखल केले गेले आहे. लाहोरमध्ये सोमवारी रात्री त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या छातीत वेदना होत होत्या, अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर सोमवारी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
माध्यमांतील वृत्तानुसार इंजमाम यांच्या माहिती अधिकाऱ्यांने माहिती दिली आहे की, आता ते धोक्याच्या बाहेर आहेत आणि त्यांची स्थिती पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. इंजमाम यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत ३७५ एकदिवसीय आणि ११९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यावर्षी टी२० विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. याच काळात पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बाॅब वूल्मर यांची हत्या करण्यात आली होती.
इंजमामबाबत माहिती समोर आल्यानंतर भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरने त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रर्थना केली आहे. सचिनने त्याच्या ट्वीटरवर पोस्ट करत लिहिले की, “तुम्हाला लवकर ठीक होण्यसाठी शुभेच्छा. तुम्ही नेहमी शांत, स्पर्धात्मक आणि मैदानावरील सेनानी रहाल. मी आशा आणि प्रार्थना करतो की, तुम्ही या परिस्थितीतून ठीक होऊन बाहेर याल. लवकर बरे व्हा.”
Wishing you a speedy recovery @Inzamam08. You've always been calm yet competitive, and a fighter on the field.
I hope and pray that you'll come out stronger from this situation as well. Get well soon.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 28, 2021
क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही इंजमाम यांच्यासाठी एक ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले की, “इंजमाम उल हक यांना लवकर ठीक होण्सासाठी शुभेच्छा. ते खूप लवकर पूर्णपणे ठीक व्हावे आणि अनेक वर्षांपर्यंत आपल्या खेळाचा भाग रहावेत”
Wishing Inzamam-ul-Haq all the very best, that he recovers completely and remains part of our game for many many years.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 27, 2021
जियो न्यूजचे पत्रकार आरफा फोरोज झॅक यांच्या ट्वीटनुसार, पाकिस्तानचे माजी दिग्गज कर्णधार इंजमाम उल हक यांना हलकासा ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर लाहोरच्या एका दवाखान्यात दाखल केले गेले. जेथे त्यांची यशस्वी अँजियोप्लास्टी केली गेली आहे. ते धोक्याच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीसंत म्हणाला, ‘त्यावेळी २ लाखांची साधी पार्टी करायचो, मग मी १० लाखांसाठी स्पॉट फिक्सिंग का करू?’
‘सगळी हॉटनेस एकाच संघात भरलीय’, कोहलीच्या शर्टलेस फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; तुम्हीही पाहा
सौरव गांगुलीला कोलकाता उच्च न्यायालयाचा दणका; जमीन वाटप प्रकरणात सुनावला आर्थिक दंड