आंतराष्ट्रीय क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेट आणि अनेक क्रिकेट लीगने क्रिकेटपटूंना मालामाल केले आहे. भारतातील बहुतेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडे अफाट संपत्ती आहे. परंतु कमाईच्या बाबतीत भारताचा शेजारी देश पाकिस्तानमधील परिस्थिती अगदी उलट आहे. २००६ मध्ये भारतीय संघाविरुद्ध शानदार गोलंदाजीद्वारे आपला ठसा उमटविणारा पाकिस्तानचा माजी ऑफस्पिनर अरशद खान आता दारिद्रीत जगत आहे.
क्रिकेटविश्वात आपण अनेक खेळाडू पाहिले आहेत, जे निवृत्तीनंतरही चैनीचे आयुष्य जगत आहेत. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल की , १९९७-१९९८ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पदार्पण करणारा अरशद खान आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सिडनी येथे उबर कॅब चालवित आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला कुटुंब सांभाळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, हे नक्कीच त्रासदायक आणि काळजीत टाकणारी गोष्ट आहे.
अरशद खानने भारताविरुद्धच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. तर स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागही त्याच्या चेंडूंसमोर संघर्ष करत होता. मात्र सेवानिवृत्तीनंतर हा खेळाडू आर्थिक पेचात सापडला आहे.
अरशद खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ९ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले होते. त्याचबरोबर त्याने पाकिस्तान संघाकडून ६० एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. ज्यात त्याच्या खात्यात ५७ बळी आहेत. अरशद खानच्या नावावर ६०१ प्रथम श्रेणी विकेट विकेट आणि १८९ लिस्ट ए विकेट आहेत. त्याच्या या आकडेवरुन तो किती चांगला गोलंदाज होता, हे सिद्ध होते.
परंतु क्रिकेटमधून निवृत्तीनंतर पैसे कमावण्याचे साधन नसल्याने अरशद खान उबर कॅबचा चालक बनला आहे. .
महत्वाच्या बातम्या
धवनला कर्णधार बनवल्याने माजी खेळाडू नाखुश; म्हणे, ‘तो ३१ वर्षीय खेळाडू होता पात्र’
‘नेट गोलंदाज म्हणून श्रीलंकेला गेल्यास आनंदी असतो,’ चेतन सकारियाचे लक्षवेधी वक्तव्य
विक्रमात सचिनच्या पुढे होता ‘हा’ खेळाडू, परंतु चर्चा व्हायची ड्रग्ज घेण्याची