क्रिकेट विश्वामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार विराट कोहलीने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तो दरवर्षी अनेक विक्रम नोंदवत असतो. आज तो सचिन तेंडुलकरने केलेल्या मोठमोठ्या विक्रमांना टक्कर देत असल्याचे दिसून येत आहे.
सचिन विराटच्या तूलनेवर शोएब अख्तरची प्रतिक्रिया
बऱ्याचदा विराट कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची तुलना सचिन तेंडुलकरसारख्या महान फलंदाजाशी केली जात असते. परंतु पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने याला हे मान्य नाही. शोएब अख्तर या दोन खेळाडूंमध्ये तुलना करणे निरर्थक आहे. सचिनचे युगच वेगळे होते, असे त्याचे म्हणणे आहे.
शोएब अख्तरने स्पोर्ट्सकीडाशी बोलताना याबद्दल वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितले की, “कोहली आणि तेंडूलकरमध्ये कसलीही तुलना होऊच शकत नाही. मास्टर ब्लास्टरने जगातील अव्वल गोलंदाजांविरूद्ध आक्रमक होऊन धावा केल्या आहेत. पण विराटचे काय? त्यामुळे अशा निरर्थक गोष्टी करणे थांबवा.”
शोएब अख्तर पुढे म्हणाला की, “मला म्हणायचे आहे की, सचिन तेंडुलकरला पूर्ण श्रेय दिले गेले पाहिजे आणि त्याची तुलना विराट कोहलीशी करणे बंद कराला हवे. सचिनच्या काळात विराटने फलंदाजी केलेली नाही. समजा 50 षटकांचा खेळ असेल आणि 10-20 षटकानंतर चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागला असेल. अशा परिस्थितीत फलंदाजाने वसीम अक्रम, वकार युनूस आणि शेन वॉर्नच्या फिरकी गोलंदाजीचा सामना करणे ही छोटी गोष्ट नाही.”
शोएब म्हणाला की, “त्या काळी प्रत्येक संघात एक दर्जेदार गोलंदाज असायचा. आता सचिन तेंडुलकरच्या युगासारखे गोलंदाजही नाहीत. त्यावेळी प्रत्येक संघात असे गोलंदाज होते, जे 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करु शकत होते. आजच्या युगात असे गोलंदाज प्रत्येक संघात नाहीत. लान्स क्लूझर, जॅक्स कॅलिस, शॉन पोलॉक, एलन डोनाल्ड, मखाया एनतिनी असे प्रत्येक संघात दर्जेदार गोलंदाज असायचे. आज आपल्याकडे असे किती गोलंदाज किती आहेत? आता पॅट कमिन्स, जोश हेझलवुड आणि पुढे? ”
महत्त्वाच्या बातम्या-
Indian Sports Honours: शास्त्रींना कोच ऑफ द ईयरचे मानांकन, रोहितच्याही पारड्यात ‘हा’ सन्मान
‘त्या मुर्खांना काही माहीत नसतं’; श्रीलंकेच्या प्रशिक्षकांचे वादग्रस्त विधान