पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज कामरान अकमल (Kamran Akmal) नेहमीच कोणत्या ना कोणत्या घटनेने चर्चेत येत असतो. आताही त्याच्याबाबतीत एक किस्सा घडला असून त्याची चांगलीच चर्चा होत आहे. लाहोर येथे एका खाजगी हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या अकमलने ईदसाठी एक बकरा आणला होता. त्या बकऱ्याची चोरी झाल्याची माहिती उघड झाली आहे.
कामरानच्याच वडिलाने बकरा चोरीला गेल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकमल कुटूंबाने ईदसाठी सहा बकरे विकत आणले होते. त्यांनी हे बकरे लाहोर येथे असलेल्या आपल्या घरात या बांधून ठेवले होते. ही घटना पहाटे तीन वाजता घडली असल्याचे समोर येत आहे. या बकऱ्यांवर देखरेख करण्यासाठी एका माणसालाही नेमले होते.
कामरानच्या वडिलांनी एका वृत्तपत्राला सांगितल्याप्रमाणे त्यांनी यातील सर्वात चांगला बकरा ९० हजार रूपयांना विकत घेतला होता. ज्या सोयायटीमधून याची चोरी झाली आहे तेथील सुरक्षारक्षकाने तो बकरा शोधून देण्याचे आश्वासन दिले आहे. “चोरांनी त्या सहा बकऱ्यांमधून जो सर्वश्रेष्ठ बकरा होता, तोच नेला आहे,” असे कामरानच्या वडिलांनी म्हटले आहे. बकरी ईदचा सण ९-१० जूनला आहे. ईदच्या आधीच बकऱ्याची चोरी झाल्याने कामरानला चांगलेच नुकसान झाले आहे.
कामरानच्या क्रिकेट कारकिर्दीकडे पाहिले असता त्याने पाकिस्तानकडून ५३ कसोटी, १५७ वनडे आणि ५८ टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने सहा हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने २००२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने कसोटी आणि वनडे पदार्पणाचे सामने झिम्बाव्वे विरुद्ध खेळले होते. तर टी२०चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००६मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने कसोटीमध्ये ६ आणि वनडेमध्ये ५ शतके केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: सामन्याचा चेंडू पंचांनी नाही तर कारने आला मैदानात, जाणून घ्या नेमकं काय झाले
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटमधील मानाचा तुराच
भुवीच्या इनस्विंग चेंडूवर बाद होऊनही त्याचच गुणगान गातोय बटलर, वाचा काय म्हणालाय