आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champion’s Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. पण त्यासाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियानं (Danish Kaneria) पुन्हा एकदा भारताच्या बाजूनं प्रतिक्रिया दिली आहे. 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी केवळ हायब्रीड मॉडेलमध्येच आयोजित करावी, असं कनेरियानं म्हटलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तानात न येण्याच्या निर्णयाचं त्यानं समर्थन केलं आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवली जाणार आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट 2008 मध्ये खेळले होते. त्यावेळी भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानात गेला होता. तेव्हापासून आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येत आहेत.
दानिश कनेरिया म्हणाला, “पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता भारतानं पाकिस्तानात जाऊ नये आणि पाकिस्ताननंही याचा विचार करायला हवा. त्यानंतर आयसीसी निर्णय घेईल. माझ्या मते हे सामने हायब्रीड मॉडेल असेल. कदाचित हे सामने दुबईत होतील. प्रसारमाध्यमे त्याचा प्रचार करतील, प्रत्येकाच्या व्हिडिओला लाईक्स मिळतील कारण ही मोठी स्पर्धा विक्रीसाठीही चांगली आहे.”
पुढे बोलताना कनेरिया म्हणाला, “खेळाडूंची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आदर ही दुसरी प्राथमिकता आहे. इथे अनेक गोष्टी आहेत. माझ्या मते बीसीसीआय खूप चांगले काम करत आहे. मला वाटते की इतर सर्व देश या अंतिम निर्णयाला पाठिंबा देतील.”
महत्त्वाच्या बातम्या-
“आय लव्ह…”, हार्दिक पांड्याच्या प्रेमात वेडी ही अभिनेत्री, उघडपणेच व्यक्त केली…
आयपीएल 2025 : 3 मोठे खेळाडू, ज्यानं रिटेन करणं संघांना पडू शकतं महागात
‘कधीकधी कुटुंब …’, विराट-रोहितची दुलीप ट्रॉफी न खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया