आगामी 2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. परंतू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संदर्भात हायब्रीड मॉडेलचीही चर्चा सुरु आहे, ज्या अंतर्गत भारतीय संघ इतर देशांमध्ये आपले सामने खेळू शकेल. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) काही दिवसांपूर्वी सुरक्षा व्यवस्थेचा हवाला देत म्हटलं होतं की, भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Aye din kya @harbhajan_singh bhai? Kuch bhi bolay ja rahay ho!
Honay ko tau US mein Trump per assassination attempt hogai. The likes of England and New Zealand have already visited Pakistan. Don’t spread falsehood.
PAK loves ☮️#CT25 #HarbhajanSinghpic.twitter.com/8uz66a0p8D
— Ameer Hamza Asif (@AmeerHamzaAsif) July 25, 2024
हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) केलेल्या वक्तव्यावर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर तनवीर अहमदनं (Tanvir Ahmed) हरभजनच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तनवीर अहमदनं एक व्हिडिओ त्याच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये अहमद म्हणाला “आम्ही सिंह आहोत आणि तुमच्या देशात खेळण्यासाठी आलो आहोत. तुम्ही या आणि इथे खेळून दाखवा. आम्ही तुम्हाला सुरक्षेसह सर्वकाही देऊ, फक्त एकदा या.”
Former Pakistani cricketer Tanvir Ahmed responded to Harbhajan Singh by saying:
Pak players are like lions, they played in India and return home. This is called a brave and fearless team. come to Pakistan will provide you security.#harbhajansingh pic.twitter.com/YglkffMz5j
— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) July 28, 2024
पुढे बोलताना तनवीर सिंग (Tanvir Singh) म्हणाला, “आम्ही तुमच्या देशामध्ये येऊन खेळलो. आमचे खेळाडू तिथं आले आणि खेळले. हारले आणि जिंकले तरीही आमच्या खेळाडूंनी भारतामध्ये खेळण्यास नकार दिला नाही. याला दिलदार खेळाडू म्हणतात.”
तनवीर अहमदबद्दल बोलायचं झालं तर तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज होता. तो पाकिस्तानसाठी एकूण 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यामध्ये कसोटी 5, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 तर एक टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. 5 कसोटी सामन्यात त्यानं पाकिस्तानसाठी 17 विकेट्स घेतल्या आहेत. तर 2 एकदिवसीय सामन्यात त्यानं 2 विकेट्स घेतल्या आहेत आणि 1 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या नावावर 1 विकेट आहे.
मह्त्त्वाच्या बातम्या-
आयपीएल : मॅक्सवेलनं इंस्टाग्रामवर केलं RCBला अनफाॅलो, जाणून घ्या काय आहे प्रकरण
मनू भाकरनं जे केलं, ते कोणताच भारतीय करू शकला नाही! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडला इतिहास
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शूटींगला सुरुवात; कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग?