---Advertisement---

हिंसाचाराच्या घटनांनंतर इम्रान खान यांना जामीन मंजूर, पाकिस्तान आणीबाणीच्या उंबरठ्यावर

Imran-Khan
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेल्या इम्रान खान यांना इस्लामाबादच्या उच्च न्यायालयाबाहेर 9 मे रोजी अटक झाली होती. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तानात अनेक ठिकाणी जाळपोळ केलेली. देशात हिंसाचाराची परिस्थिती उद्भवल्या नंतर आता इम्रान यांना जामीन मिळाला असून, आता कोणत्याही प्रकरणात त्यांना 17 मे पर्यंत अटक केली जाऊ शकत नाही.

इम्रान खान हे पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री पद देखील भूषवले आहे. अटके नंतर पाकिस्तानात मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर तीनच दिवसात इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब आणि न्यायमूर्ती समन रफत इम्तियाज यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील सर्व प्रतिवादींना पुढील सुनावणीसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले. सध्या केवळ जामीन मिळाला असल्याने, त्यांच्या समर्थकांनी अजूनही शांततापूर्ण मार्गाने आपला विरोध चालू ठेवणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार राहिलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानकडून एकूण 88 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 37.69 च्या सरासरीने 3807 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त्त त्यांनी गोलंदाजी करताना कसोटीत 2.66च्या इकॉनॉमी रेटने 362 बळीही घेतले होते. दुसरीकडे, त्यांनी 175 वनडे सामने खेळताना 33.41च्या सरासरीने 3709 धावा केल्या आहेत. वनडेत त्यांनी 3.9 च्या इकॉनॉमी रेटने 182 बळी मिळवलेले. त्यांच्याच नेतृत्वात पाकिस्तानने 1992 वनडे क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला.

(Former Pakistan PM And Skipper Imran Khan Grant Bail In One Case)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मी स्वतःहून कधीच…’, विराटसोबतच्या वादानंतर नवीन उल हकची पहिलीच मुलाखत
जोस बटलरवर बीसीसीआयची मोठी कारवाई! ‘त्या’ कृत्यासाठी बसला ‘एवढा’ मोठा दंड

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---