गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्यांना उधाण आले होते. दिग्गज क्रिकेटपटूबाबतची ही बातमी वाऱ्याच्या वेगाने जगभरात पसरली होती. संपूर्ण पाकिस्तानसह सचिन तेंडुलकर आणि अशा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु आता स्वतः इंजमाम उल हक यांनी या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तानुसार, “गेले ३ दिवस इंजमाम उल हक यांची स्थिती नाजूक होती. त्यांना खूप वेदना होत होत्या. परंतु वैद्यकीय तपासात त्यांना कुठलाही आजार नसल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सोमवारी (२७ सप्टेंबर) पुन्हा एकदा तपास करण्यात आला त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता.”
त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना लाहोरच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले होते. त्यानंतर जियो न्यूजच्या पत्रकारांनी ट्विट करत म्हटले होते की, “पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामुळे त्यांना लाहोरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. ते आता धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.”
पण या सर्व बातम्यांना खोटं ठरवत इंजमाम उल हक यांनी म्हटले की, “मला हृदयाचा कुठलाही आजार नव्हता. मला पोटामुळे अँजिओप्लास्टी करावी लागली. मला इंजियोग्राफी करायची होती. परंतु इंजियोग्राफी करत असताना आढळून आले होते की, माझी एक नस दाबली गेली आहे. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी स्टेंट टाकण्यात आले होते. भविष्यात हृदयाचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मी यूट्यूबवर काही बातम्या पहिल्या, ज्यामध्ये मला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले होते. परंतु, असे काहीच नव्हते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर १२ तासांनी मी रुग्णालयातून बाहेर आलो होतो आणि मी आता ठीक आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचेच मी आभार मानतो.”
महत्वाच्या बातम्या –
“टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व देश पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी त्यांच्या मागे धावतील”
मुंबईकडून पराभूत होऊनही पंजाबच्या खेळाडूंचे भरले खिसे, मिळाली ‘इतक्या’ लाखांची बक्षिसे
बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या वेळापत्रकात बदल करण्यामागे आहे ‘रहाणे कनेक्शन’?, घ्या जाणून