---Advertisement---

प्रभसिमरन सिंगची अर्धशतकी खेळी: पंजाब किंग्जचा चाैफेर विजय!

---Advertisement---

आयपीएल 2025चा तेरावा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात खेळला गेला. लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने पंजाबला 172 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात, पंजाब किंग्जने हे लक्ष्य 16.2 षटकांत 8 विकेट्स राखून पूर्ण केले. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. ज्यात प्रभसिमरन सिंगची खेळी निर्णयाक ठरली.

टाॅस गमावून पहिल्या डावात खेळताना लखनऊने आयुष बदोनी (41 धावा) आणि निकोलस पूरन (44 धावा) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 171 धावा केल्या. गोलंदाजीत पंजाबकडून अर्शदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्जने सुरुवातीपासूनच चांगल्या लयीत खेळ केला. सलामीवीर प्रियांश आर्य तिसऱ्या षटकात बाद झाला, पण त्याचा परिणाम पंजाबच्या फलंदाजीवर कधीच दिसून आला नाही. कारण यानंतर प्रभसिमरन सिंगने मोर्चा सांभाळला आणि जबाबदारी स्वीकारत अर्धशतकी खेळी खेळली.

सुरुवातीची विकेट गमावल्यानंतर, प्रभसिमरन सिंगने श्रेयस अय्यरसोबत 84 धावांची भागीदारी रचली. दोघांच्याही फलंदाजीमुळे हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. ज्यात प्रभसिमरनने 34 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने 9 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कारही मिळाला.

नंतर, प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या नेहल वधेराने कर्णधार श्रेयस अय्यरसह जबाबदारी स्वीकारली. दोघेही विजयासह परतले. श्रेयस अय्यरने 30 चेंडूत 52 धावा करत नाबाद राहिला. तर नेहल वधेराने 25 चेंडूत 43 धावांची तुफानी खेळी केली. एलएसजीकडून दिग्वेश सिंग राठीने दोन्ही विकेट घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---