भारत आणि पाकिस्तान हे दोन देश जेव्हा भिडतात तेव्हा नेहमीच तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत असते. केवळ खेळाडूच नाही तर चाहतेही अनेकदा अतिउत्साही झाल्याचे दिसून येते. असंच काहीसं सध्याही झाल आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान संघ आशिया चषकता त्यांचा पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्याआधी अनेक आजी-माजी खेळाडू आपली प्रतिक्रिया देत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने भारतीय संघाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
आपल्या युट्युब चॅनेलवर बोलताना बट सातत्याने क्रिकेटविश्वातील विविध घटनांवर प्रतिक्रिया देत असतो. आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याविषयी देखील त्याने आपले मत व्यक्त केले. भारत आशिया चषक जिंकू शकतो का? या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले,
“हा नक्कीच जिंकू शकतात. त्यांच्यांत व्हिटॅमिनची कमतरता आहे का? स्पर्धेत सर्वच संघ मजबूत असून, कोणीही आशिया चषक जिंकू शकते. भारताकडे एक उत्कृष्ट संघ आहे म्हणून लोक त्यांना फेवरेट म्हणत आहेत.”
पाकिस्तान संघाबद्दल बोलताना तो म्हणाला, “पाकिस्तान संघातही ती गोष्ट आहे. टी२० मध्ये एक चांगली भागीदारी खेळाचा नूर पालटले. बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांमध्येही विजेता होण्याची क्षमता नक्कीच आहे.”
यावेळी आशिया चषकाला २७ ऑगस्ट रोजी सुरुवात होईल. तर अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
भारताने ७ वेळा आशिया चषक जिंकला आहे
आशिया चषकाच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर श्रीलंकेचा संघ ५ वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. भारताने ४ वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग ६ चेंडूत ६ षटकार मारणारा ‘हा’ भारतीय खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध करणार आंतरराष्ट्रीय पदार्पण?
VIDEO: मनिष पांडेचा झेल पाहून म्हणाल, “हाच भारताचा बेस्ट फिल्डर”