---Advertisement---

“गप्प बसता, लाज नाही वाटत…”, बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांवर पाकिस्तानी क्रिकेटपटू संतप्त

On: शनिवार, ऑगस्ट 10, 2024 2:58 PM
Danish-Kaneria
---Advertisement---

बांगलादेशात हिंदू धर्माच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्यानं येत असतात. इंटरनेटवर असे अनेक भयानक व्हिडिओ आहेत, जे पाहून तुमच्या शरीराचा थरकाप उडेल. जाळपोळ आणि लुटमारीच्या घटना जवळपास संपूर्ण देशात सामान्य आहेत.

मुस्लिमबहुल बांगलादेशात सुमारे 8 टक्के हिंदू राहतात. तेथील हिंदूंची लोकसंख्या 1 कोटी 30 लाख आहे. तेथील अनेक हिंदू गावं जाळण्यात आली असल्याचा दावा एका अहवालात केला आहे. याशिवाय महिलांवर अत्याचार होत असून मॉब लिंचिंगचेही अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अशाच एका घटनेचा व्हिडिओ ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ नावाच्या युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आल्याचं यामध्ये लिहिलं आहे. यासोबत एक व्हिडिओ देखील आहे. हा व्हिडिओ इतका भीषण आहे की आम्ही तो तुम्हाला इथे दाखवूही शकत नाही.

आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यानं या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा मुद्द्यांवर तो आपलं मत सातत्यनं मांडत असतो. व्हिडिओवर कमेंट करताना या माजी लेग स्पिनरनं लिहिलं, हिंदूंवर होत असलेले अत्याचार पाहून माझं रक्त उकळत आहे. यावर संयुक्त राष्ट्र, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचं मौन शरमेची बाब आहे. यासोबत त्यानं हॅशटॅगमध्ये ‘सेव्ह बांगलादेशी हिंदू’ असं लिहिलं आहे.

भारताच्या शेजारील बांगलादेशात आंदोलनाच्या नावाखाली प्रचंड गदारोळ सुरू आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारतात आश्रयास आल्या आहेत. हिंदूंवर सातत्यानं होणाऱ्या अत्याचाराबाबत ढाका येथे निदर्शने करण्यात आली. नुकतेच ढाक्यातील शाहबाग चौकात हजारो हिंदू जमले होते. येथे त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी चार मागण्या केल्या. तसेत त्यांनी आम्ही बांगलादेश सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

हेही वाचा – 

धोनी आयपीएलमध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार? आर अश्विनची प्रतिक्रिया चर्चेत
‘..तर आम्ही फिफा विश्वचषकही जिंकू’, सुवर्णपदक जिंकल्यानंतर पाकिस्तानचा हास्यास्पद दावा
ढोल-ताशा आणि डान्स, भारतीय हॉकी संघाचं मायदेशात अश्या पध्दतीनं स्वागत! पाहा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---