पाकिस्तान क्रिकेट संघाने त्यांची टी-२० विश्वचषकातील सरुवात चांगली केली आहे. पाकिस्तान संघाने विश्वचषकातील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तानने न्यूझीलंडला पाच विकेट्स राखून पराभूत केले. या विजयानंतर पाकिस्तान संघाने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याचा मार्ग सोपा केला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर त्यांचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानने विश्वचषकात सलग दोन सामने जिंकून ग्रुप २ मधील त्यांचे स्थान मजबूत केले आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड सामना भारतासाठी महत्त्वाचा होता आणि पाकिस्तानने त्यांचे काम सोपे केले, असे शोएब अख्तर म्हटला आहे. विश्वाचषकात आता भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात ३१ ऑक्टोबर आमना-सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने ही प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “असे पहिल्यांदाच झाले आहे की, भारत पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करत होता आणि आम्ही त्यांना वाचवले आहे. चांगले शेजारी असेच करतात. हे लक्षात ठेवा, आमची इच्छा आहे की, भारत अंतिम सामन्यामध्ये पोहोचावा आणि आम्ही अंतिम सामन्यात त्यांचा सामना करण्यासाठी तयार आहोत.”
न्यूझीलंड संघाने मागच्या काही दिवसांपूर्वी अचानक पाकिस्तानविरुद्ध खेळली जाणारी त्यांची मालिका रद्द केली होती. न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव ही मालिका रद्द केली होती. याच पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने आता न्यूझीलंड संघावरही निशाणा साधला आहे. तो पुढे बोलताना म्हणला की, “मी प्रत्येक पाकिस्तानी आणि भारतीयाला विनंती करतो की, त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डला इ-मेल पाठवावा की, पाकिस्तान सुरक्षित आहे, पण खेळण्यासाठी सुरक्षित संघ नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘मला वाटतं सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्या आयपीएल संघ विकत घेऊ शकतात’, ललित मोदींनी साधला निशाणा
टी२० क्रमवारीत मोठे फेरबदल; रिजवानने मिळवले चौथे स्थान, तर विराट-केएलला मोठे नुकसान