ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यातील मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघाने कांगारू संघाला ख्रिसमसची भेट दिली. ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर केरी ओ’कीफे याने याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला ख्रिसमसची भेट दिली आहे पण असे केल्याने ते कांगारू संघाविरुद्धची कसोटी मालिका जिंकू शकणार नाहीत, असे त्याने म्हटले आहे. सौरव गांगुलीने स्टीव्ह वॉ याला ख्रिसमस गिफ्ट दिले असते का? असा प्रश्नही केरी ओ’कीफे यानी केला. कीफेच्या मते, पाकिस्तान संघाला कडवी द्यावी लागणार आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने पाकिस्तानने ऑस्ट्रेलियन संघाला भेटवस्तू दिल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मेलबर्नमध्ये इनडोअर नेटवर सराव करताना दिसत आहेत. सरावाच्या वेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे कुटुंबीयही उपस्थित होते. तेवढ्यात पाकिस्तानी संघ तिथे पोहोचला. पाकिस्तानी संघ संपूर्ण ऑस्ट्रेलियन कॅम्प आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी खास भेटवस्तू घेऊन गेला होता. यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मुलांसाठी कँडीज चाॅकलेट देखील होत्या. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची मुले चाॅकलेट घेऊन खूप आनंदी झालेली दिसत आहेत.
फॉक्स क्रिकेटवर बोलताना केरी ओ’कीफे (Kerry O’Keefe) यानी पाकिस्तान संघाला भेटवस्तू देण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान संघ इतक्या सहजासहजी ही मालिका जिंकू शकणार नाही, असे तो म्हणाला. तो पुढे म्हणाला, “ही मालिका चांगल्या भावनेने खेळवली जात आहे का? तुम्ही फक्त भावनेने ऑस्ट्रेलियाला हरवू शकत नाही. काल पाकिस्तानी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ख्रिसमसची भेट दिली. सौरव गांगुली (Sourav Ganguly) स्टीव्ह वॉसाठी ख्रिसमस गिफ्ट घेऊन आला असता का? नाही, तो असे अजिबात करत नाही.” (Former player reacts to Pakistan-Australia Christmas visit says Sourav Ganguly was like that to Steve Waugh)
हेही वाचा
बर्गरचा कहर! 3 ओव्हरमध्ये घेतल्या दोन विकेट्स, टीम इंडिया दबावात
लय भारी! 2023मध्ये 6 क्रिकेटर्स ठरले नशीबवान, केले भारताकडून कसोटी पदार्पण