---Advertisement---

विराटच्या चाहत्याने पाळला दिलेला शब्द! 74व्या शतकाच्या दिवशीच थाटला संसार, फोटो शेअर करत दिली माहिती

Virat-Kohli
---Advertisement---

जगभरात असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांच्या चाहत्यांची संख्या लाखो, कोट्यवधीच नाही, तर अब्जामध्ये आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराट सध्या खतरनाक फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2 शतके झळकावली आहेत. त्यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यातही शतक झळकावले होते.

विशेष म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) हा आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेपूर्वी विराट कोहली 3 वर्षे खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे विराटचे चाहतेही त्याच्या फॉर्मविषयी सातत्याने चिंता व्यक्त करत होते. अमन अगरवाल नावाच्या विराटच्या चाहत्याने निश्चय केला होता की, जोपर्यंत विराट कोहली त्याचे 71वे शतक ठोकणार नाही, तोपर्यंत तो लग्नाबाबत विचार करणार नाही. एका सामन्यादरम्यान अमन याच्याशी संबंधित पोस्टर घेऊन स्टेडिअममध्ये आला होता.

आता दिलेला शब्द पाळत अमन याने विराटच्या शतकाचा वनवास संपल्यानंतर लग्नगाठ बांधली आहे. अमनचे लग्न 15 जानेवारी रोजी झाले. विशेष म्हणजे, विराटने त्यादिवशीच त्याचे 74वे आंतरराष्ट्रीय शतकदेखील ठोकले. अमनने त्याचा लग्नाच्या कपड्यांमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या मागे टीव्हीवर विराटही दिसत आहे.

विराटची शतके
विराटने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात नाबाद 166 धावांची वादळी खेळी साकारली होती. वनडे क्रिकेटमधील विराटची ही भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय धावसंख्या ठरली. विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. विराटने मागील 4 वनडे डावात 3 शतके झळकावली आहेत. अशाप्रकारे विराटने आता एकूण 46 वनडे शतके झळकावली आहेत. दुसरीकडे, सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 49 शतके झळकावली आहेत.

सचिनला याबाबतीत सोडले मागे
विराटने 166 धावांच्या खेळीसह देशांतर्गत मैदानांवर सर्वाधिक शतके झळकावण्याचा सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडीत काढला आहे. विराटने भारतात 21 शतके ठोकले आहेत, जे सचिनच्या शतकांपेक्षा जास्त आहेत. विराट आता 18 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आपल्या फलंदाजीचा दम दाखवताना दिसणार आहे. (former skipper virat kohli team india star batter fan marriage 71st hundred wedding ind vs nz odi)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिला विश्वचषकात पाकिस्तानच्या कर्णधाराचा अफलातून कॅच, व्हिडिओ पाहून पुरुष खेळाडूंच्याही बत्त्या होतील गुल
विराटसाठी खूपच खास आहे न्यूझीलंड मालिका, मोडू शकतो सेहवाग आणि पाँटिंगसारख्या दिग्गजांचा ‘हा’ विक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---