भारताचा फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी संघाची घोषणा करताना कोहलीचा समावेश नसणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे कोहलीच्या सहभागाबाबत सुरू असलेल्या चर्चा आता संपुष्टात आल्या आहेत. कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांतही सहभाग नोंदवला नव्हता. पण, सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने एक मोठा खुलासा केला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर म्हणाला आहे की, “जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा असे वाटले की मी अश्विन आणि जडेजासमोर स्वतःचे संरक्षण करत आहे. तेव्हा कोहली माझ्यावर थुंकला होता. त्याला प्रत्युत्तरात मी कोहलीला घाणेरडे म्हटले होते. त्यावेळी विराट कोहली आणि माझ्यामध्ये शिवीगाळ देखाल झाली होती.”
याबरोबरच,कोहलीने आपली माफी मागितल्याचा खुलासाही एल्गारने केला आहे. 2017-18 मध्ये भारत जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा कोहलीने एल्गरची माफी मागितली होती. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन सामने झाले आहेत. तर बीसीसीआयने शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाचीही घोषणा केली आहे.
याबद्दल स्टार क्रिकेटर विराट कोहलीने या बद्दल भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला कळवलय. कोहली पहिल्या दोन कसोटीत खेळला नाही, त्यानंतर तो तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळणार नाही, असं बोलल जात होतं. पण आता तो या सीरीजमधूनच बाहेर झाला आहे.
दरम्यान, 2011 साली टेस्ट डेब्यु करणाऱ्या विराट कोहलीला आपल्या संपूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा असा दिवस पहावा लागलाय. मायदेशात झालेल्या टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहली एकही टेस्ट मॅच न खेळण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी सुद्धा काहीवेळा अस झाल आहे. कोहली त्यावेळी टेस्ट सीरीजच्या एकाही सामन्यात खेळला नव्हता. पण पहिल्यांदाच होम टेस्ट सीरीजमध्ये न खेळताच विराट कोहली बाहेर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या –
Ranji Trophy : क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, ‘BCCI ने रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे…
VIDEO । ‘आई-वडिलांनी ठरवले की त्या दिवशी…’, स्वतः एमएस धोनीने सांगितले 7 नंबरच्या जर्सीमागील कारण