भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी 2011 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यात स्वत: वरच्या क्रमांकावर फलंदाजीला होतो. ही आजही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटनांपैकी आहे. विशेष म्हणजे, युवराज सिंग शानदार फॉर्ममध्ये होता. विराट कोहली बाद झाल्यानंतर युवराज गौतम गंभीर याच्यासोबत मैदानावर उतरण्याची आशा होती. मात्र, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत धोनी युवराजच्या जागी फलंदाजीला आला. यादरम्यान धोनीने सर्वांना चकित करत एक शानदार खेळी खेळली आणि भारताला 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकून दिला. अशात धोनीच्या या रणनीतीचा श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने खुलासा केला आहे.
धोनीच्या रणनीतीची मुरलीधरनला होती कल्पना
मंगळवारी (दि. 27 जून) वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याने मत मांडले आहे. यासोबतच त्याने 2011 वनडे विश्वचषक (2011 ODI World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएस धोनी (MS Dhoni) स्वत: वरच्या क्रमांकावर फलंदाजीला येण्यामागील रणनीतीविषयीही चर्चा केली. तो म्हणाला की, त्याला याविषयी माहिती होते की, एका फलंदाजाची विकेट पडल्यानंतर भारतीय कर्णधार धोनी स्वत: फलंदाजीला येईल.
तो म्हणाला की, “मला माहिती होतं. यामागील कारण होतं की, युवराज माझ्याविरुद्ध खेळताना संघर्ष करायचा. युवराज त्यावेळी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू होता. कारण, मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर त्याने शानदार प्रदर्शन केले होते. मला माहिती होतं की, धोनी या क्रमांकावर वरती खेळायला येईल. कारण, मी चेन्नईमध्ये नेट्समध्ये त्याच्याविरुद्ध खूप गोलंदाजी करत होतो. कारण, आम्ही आयपीएल खेळत होतो. त्यामुळे धोनीला खूप चांगलं माहितीये की, माझ्याविरुद्ध कसं खेळलं पाहिजे.”
पुढे बोलताना तो असेही म्हणाला की, “ज्यावेळी तो (विराट कोहली) बाद झाला, तेव्हा धोनी स्वत: वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. मला माहिती होतं की, तो येईल. कारण, त्याला माहितीये की माझ्या गोलंदाजीवर कशाप्रकारे खेळलं पाहिजे.”
श्रीलंकेसाठी क्वालिफायर खूपच दुर्दैवी
यावेळी मुरलीधरनने क्वालिफायरमध्ये खेळणे दुर्दैवी असल्याचे म्हटले. तो म्हणाला की, “आम्ही मागील दोन वर्षात चांगले खेळलो नाही. तरीही मला वाटते की, श्रीलंकेकडे खूप चांगली प्रतिभा आणि चांगले फिरकी गोलंदाज, चांगले गोलंदाजी आक्रम आणि चांगले फलंदाज आहेत. दुर्दैवाने आम्ही मागील चार-पाच वर्षांमध्ये आमच्या क्षमतांनुसार खेळलो नाही. आमच्याकडे एक यशस्वी आशिया चषक होते, पण तो टी20 क्रिकेट आहे. टी20 आणि वनडे क्रिकेट खूप वेगळे आहे.”
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान पार पडणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाईल. (former spinner muttiah muralitharan makes big revelation on dhoni coming in up batting order of 2011 world cup final)
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकापूर्वीच सेहवागची मोठी भविष्यवाणी, ‘हे’ 4 संघ खेळतील सेमीफायनल; भारताव्यतिरिक्त 3 टीम कोणत्या?
‘एमएस धोनी सर्वात खतरनाक गोलंदाज’, माजी सहकाऱ्याचे मोठे विधान, वाचून शमी अन् बुमराह होतील हैराण