युएई येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या पदरी मोठे अपयश पडले. विजेतेपदाचे प्रमुख दावेदार म्हणून स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ अंतिम फेरीत जागा बनवू शकला नाही. मोक्याच्या क्षणी भारतीय संघ आपली कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरला. त्यानंतर आता पुढील आठवड्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. कोण असू शकतात हे खेळाडू यावर टाकलेली नजर.
संजू सॅमसन-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. सध्या भारतीय संघातील प्रमुख यष्टिरक्षक असलेला रिषभ पंत खराब फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघात खेळताना दिसेल. बीसीसीआयच्या काही सूत्रांनी सॅमसनला विश्वचषक संघात स्थान मिळू शकते, असे संकेत दिलेले. त्यामुळे त्याचीदेखील पडताळणी करण्यासाठी सॅमसनला आजमावता येऊ शकते.
ईशान किशन-
सॅमसनप्रमाणेच दुसरा यष्टीरक्षक ईशान किशन यालादेखील पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. किशन मागील काही काळापासून भारतीय संघाचा भाग होता. मात्र, वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पुन्हा एकदा त्याला संधी देत, त्याच्या फॉर्मची चाचपणी निवडसमिती करू शकते.
शार्दुल ठाकूर-
गेल्या दोन वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेला अष्टपैलू शार्दुल ठाकूर अचानकपणे संघाबाहेर गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही विभागात योगदान देणारा अष्टपैलू ठाकूर हार्दिक पंड्याला पर्याय म्हणून संघात सामील होऊ शकतो.
शाहबाझ अहमद-
रवींद्र जडेजा दुखापतीमुळे विश्वचषकात खेळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्याच्यासारखीच प्रतिभा असलेला अक्षर पटेल हा संघाचा भाग असला तरी, निवडसमिती आयपीएलमधून नाव कमावलेला शाहबाझ अहमद याला संधी देऊ शकते. शाहबाझ हा खालच्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी तसेच उपयुक्त फिरकी गोलंदाजी करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकासाठी माजी दिग्गजाने निवडला भारतीय संघ! आशिया चषकात नसलेल्या ‘या’ खेळाडूंना दिलंय स्थान
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…
‘पोलार्ड, रसेल अन् पूरन असूनही संघाने गमावला सामना!’ कमी धावसंख्येचा पाठलाग करण्यास फेल ठरले दिग्गज