रविचंद्रन अश्विन गुरुवारी (7 मार्च) आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. भारतीय संघ सध्या मायदेशात इंग्लंडसोबत पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना गुरुवारी धरमशाला स्टेडियमवर सुरू होईल. हा सामना केवळ अश्विनसाठी खास आहेच. पण इतरही तीन क्रिकेटपटू आहेत, जे येत्या चार दिवसांमध्ये आपला 100वा कसोटी सामना खेळणार आहेत.
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाचवा कसोटी सामना रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासह इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो () याच्यासाठीही खास असेल. या दोन्ही दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीतील हा 100वा सामना असणार आहे. दोघांनी आतापर्यंत आपल्या देशासाठी प्रत्येकी 99-99 सामने खेळले आहेत.
8 मार्च रोजी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूजीलंडचे दोन दिग्गज केन विलियम्सन आणि टिम साऊदी आपला 100 कसोटींचा टप्पा पार करतील. या दोघांनीही न्यूझीलंडसाठी प्रत्येकी 99-99 कसोटी सामने खेळले आहेत. म्हणजेच 7 आणि 8 मार्च या दोन दिवसात एकूण 4 दिग्गज क्रिकेटपटू आपल्या 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करतील.
दरम्यान, आतापर्यंत एकूण 75 असे खेळाडू आहेत, ज्यांनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. आता आर अश्विन, जॉनी बेअरस्टो, केन विलियम्सन आणि टिम साऊदी या चौघांची नावेही या यादीत सामील होतील. भारताकडून याआधी 13 खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. तर इंग्लंडसाठी ही कामगिरी करणाऱ्यांची संख्या 16 आहे. तसेच न्यूझीलंडसाठी 4 खेळाडूंनी आतापर्यंत 100 कसोटी सामने खेळले आहेत. (Four players will play 100th Test match in two days; R Ashwin also included among the veterans)
महत्वाच्या बातम्या –
धरमशालेत रोहितची रॉयल एन्ट्री! बस-कार नाही, थेट चॉपरमधून उतरला भारतीय कर्णधार
Ranji Trophy 2024 । तामिळनाडूच्या पराभवानंतर दिग्गजाचा प्रशिक्षकांवर निशाना, कर्णधार साई किशोरसोबत चुकीचे वर्तन!