आयपीएल 2023 साठी चाहत्यांसह सर्व संघ देखील तयार आहे. आयपीएलचा हा आगामी हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. सोमवारी (27 मार्च) आयपीएल खेळणाऱ्या सर्व कर्णधारांची यादी समोर आली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एमएस धोनी (MS Dhoni) दरवर्षीप्रमाणे आपल्या संघांची कमान सांभाळणार आहेत. पण यावर्षी अनेक संघांचे कर्णधार बदलेले दिसतील.
हे खेळाडू आपल्या संघाच्या कर्णधारपदाव कायम
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार यावर्षीही हार्दिक पंड्या (Hardik Pandya) असेल. मागच्या वर्षी हार्दिकने आपल्या नेतृत्वात गुजराद टायटन्सला ट्रॉफी जिंकवून दिली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कमान मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही फाफ डू प्लेसिस सांभाळणार आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघ यावर्षीही संजू सॅमसन याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच लखनऊ सुपर जायंट्सच्या नेतृत्वात देखील काहीच बदल नसेल. केएल राहुल यावर्षीही आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावून प्रदर्शन आणि नेतृत्व करेल.
नितीश राणा पहिल्यांदाच बनला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार
कोलताना नाईट रायडर्सचे आगमी हंगामात नेतृत्व नितीश राणाकडे सोपवले गेले आहे. संघाचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आगामी हंगामात खेळणार नाहीये. अशात केकेआरची कमान यावेळी अय्यरऐवजी नितीश राणा (Nitish Rana) सांभाळेल. पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन असेल. मागच्या हंगामात मयंक अगरवाल पंजाबचा कर्णधार होता. यावर्षी अगरवाल सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळणार आहे. तसेच मागच्या वर्षी केन विलियम्सनच्या नेतृत्वात खेळणारा सनरायझर्स हैदराबाद संघ यावर्षी एडन मार्करम याच्या नेतृत्वात खेळेल. विलियम्सन आगामी हंगामात गुजरात जायंट्ससाठी खेळताना दिसेल.
त्याव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर असेल. दिल्लीचा नियमित कर्णधार रिषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झाला. पंतला या दुखापतीतून सावरण्यासाठी पुढचा मोठा काळ लागणार आहे. असात आगामी हंगामात दिल्लीचे कर्णधारपद वॉर्नर सांभाळेल. वॉर्नरच्या नेतृत्वात यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
आयपीएल 2023 मध्ये या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळणार संघ
चेन्नई सुपर किंग्ज- एमएस धोनी
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – फाफ डू प्लेसिस
गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल
कोलकाता नाईट रायडर्स – नितिश राणा
पंजाब किंग्ज – शिखर धवन
सनरायझर्स हैदराबाद – ऍडन मार्करम
दिल्ली कॅपिटल्स – डेविड वॉर्नर
(Four teams will get new captains in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिखर धवनला करावी लागलेली HIV टेस्ट, मनाली ट्रिपमध्ये काय झालेलं वाचाच
पाकिस्तानी फलंदाज सूर्याच्या एक पाऊल पुढे! सलग 4 सामन्यात खोलले नाही खाते, तीन वर्षापासून…