आयपीएल 2023 चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनलवर पाहायला मिळणार आहे. यावर्षीच्या चाहत्यांना टीव्हीवर आयपीएल सामना पाहताना एक अधिकची सुविधा स्टार स्पोर्ट्स देणार आहे. या नवीन सुविधेमुळे मूकबधीर चाहत्यांना मैदानातील थरार अनुभवता येऊ शकतो.
आयपीएल सामना स्टेडियमला जाऊन पाहण्यात जी मजा आहे, ती मजा समालोचक घरबसल्या चाहत्यांना देण्याच्या प्रयत्नात असतात. पण मूकबधीर चाहत्यांना मात्र समालोचकांचे बोलणे ऐकू येत नाही. याच कारणास्तव स्टार स्पोर्ट्स यावर्षीपासून आयपीएल सामना सुरू असताना खाली सबटाइटल देखील देणार आहे. या नवीन सुविधेमुळे मूकबधीर चाहत्यांना सामन्याता थरार अधिक चांगल्या पद्धथीने अनुभवता येऊ शकतो.
ही नवीन सुविधा यावर्षीपासून स्टार स्पोर्ट्स देणार असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली. “चाहत्यांचा अनुभव सुधरवण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेहमीच सर्वात पुढे असते. सपटायटल फिडसारखी सुविधा देण्याचा आम्हाला अभिमान आहे. मूखबधीर प्रेक्षकांसह सर्वांसाठी सामना अधिक रोमांचक करणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. या नवीन सुविधेमुळे आम्ही चाहत्यांना खेळाच्या अधिकच जवळ घेऊन जात आहोत. यामुळे चाहत्यांना आयपीएलचा थरार अनुभवण्याची संधी मिळेल,” असे स्टार स्पोर्ट्सचा हा अधिकारी म्हणाला.
दरम्यान, आयपीएलच्या हा आगामी हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पहिला सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अहमदाबाद स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हंगामातील हा पहिला सामना शुक्रवारी, 31 मार्च रोजी खेळला जाईल. भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनी याचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असण्याची शक्याता वर्तवली जात आहे. असात चाहते धोनीला पाहण्यासाठी उत्सुकत आहेत. तसेच धोनी आपल्या नेतृत्वात सीएसकेला अजून एक आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, सीएसके सध्या मुंबई इंडियन्सनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा संघ आहे. मुंबईने 5 तर सीएसकेने 4 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर केकेआरचा नवा कर्णधार घोषित! श्रेयसच्या अनुपस्थितीत ‘या’ वादळी फलंदाजाकडे धुरा
बीसीसीआयकडून आयपीएल फ्रॅंचाईजींना तंबी! खेळाडूंच्या दुखापतींबाबत ‘नो कॉम्प्रमाईज’, रोहित-हार्दिक मानणार का?