---Advertisement---

आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत सैनुमेरो जालन गोशॉक संघांचा सलग चौथा विजय

On: शनिवार, ऑगस्ट 27, 2022 8:38 PM
---Advertisement---

पीवायसी हिंदू जिमखाना क्लब यांच्या वतीने आयोजित आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत सैनुमेरो जालन गोशॉक संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग चौथा विजयाची नोंद केली. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत गट साखळी फेरीत अ गटात सैनुमेरो जालन गोशॉक संघाने रावेतकर कॉमेट्स संघावर 5-1 असा सहज विजय मिळवला. विजयी संघाकडून मकरंद चितळे, योहान खिंवसरा, मिहीर विंझे, सिद्धार्थ निवसरकर, अनिकेत सहस्त्रबुद्धे, तुषार मेंगळे, हरीश अय्यर, समीर जालन, अविनाश दोशी, गिरीश खिंवसरा यांनी सुरेख कामगिरी केली. ब गटात व्लेझिंग ग्रीफिन्स संघाने बेलवलकर देवधर ऑस्प्रिज संघाचा 4-2 असा पराभव केला. ग्रीफिन्स संघाकडून आकाश सूर्यवंशी, विक्रांत पाटील, आदित्य देशपांडे, निखिल चितळे, ईशान लागु, विमा हंसराज, राहुल पाठक, श्रीदत्त शानबाग यांनी अफलातून कामगिरी केली

ब गटात केदार नाडगोंडे, निखिल शहा, सारंग आठवले, राजश्री भावे, नितीन कोणकर, प्रांजली नाडगोंडे, आदर्श बोथरा, साहिल ठाकरे, अनिल देडगे, मनीष शहा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर अर्बन रेव्हन्स संघाने हमद एअर चार्टर्स स्विफ्ट्स संघाचा 4-2 असा सहज पराभव करून विजय मिळवला अ गटात ऍकच्युअल फिनिक्स संघाने ईगल्सचा 4-3 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी: 

गट ब: अर्बन रेव्हन्स वि.वि.हमद एअर चार्टर्स स्विफ्ट्स 4-2(गोल्डन खुला दुहेरी 1: जयदीप गोखले/मिहीर आपटे पराभुत वि.मधुर इंगळहाळीकर/तेजस चितळे 12-21, 20-21; गोल्डन खुला दुहेरी 2: केदार नाडगोंडे/निखिल शहा वि.वि.अभिजीत राजवाडे/चंद्रशेखर आपटे 21-16, 21-17; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: सारंग आठवले/राजश्री भावे वि.वि.आदित्य गांधी/शताक्षी किणीकर 21-13, 21-14; सिल्व्हर खुला दुहेरी 3: नितीन कोणकर/प्रांजली नाडगोंडे वि.वि.ऋषिकेश पेंडसे/विश्वेश कटक्कर 21-08, 21-15; सिल्व्हर खुला दुहेरी 4: आदर्श बोथरा/साहिल ठाकरे वि.वि.चिनार ओक/सुचिता जोशी 21-13, 21-19; वाईजमन खुला दुहेरी: अनिल देडगे/मनीष शहा वि.वि.सचिन अभ्यंकर/संदीप तपस्वी 21-11, 21-10);

गट ब: व्लेझिंग ग्रीफिन्स वि.वि.बेलवलकर देवधर ऑस्प्रिज 4-2(गोल्डन खुला दुहेरी 1: हर्षवर्धन आपटे/ईशान भाले पराभुत वि.आनंद शहा/आर्य देवधर 08-21, 18-21; गोल्डन खुला दुहेरी 2: आकाश सूर्यवंशी/विक्रांत पाटील वि.वि.देवेंद्र चितळे/तुषार नगरकर 21-16, 21-09; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: करण पाटील/आरुशी पांडे पराभूत वि.कुणाल पाटील/चैताली नवरे 10-21, 21-19, 08-21; सिल्व्हर खुला दुहेरी 3: आदित्य देशपांडे/निखिल चितळे वि.वि.अमोल मेहेंदळे/रोहित भालेराव 21-10, 21-06; सिल्व्हर खुला दुहेरी 4: ईशान लागु/विमा हंसराज वि.वि.नकुल बेलवलकर/सलोनी केळकर 21-09, 21-15; वाईजमन खुला दुहेरी: राहुल पाठक/श्रीदत्त शानबाग वि.वि.संदीप साठे/संजय फेरवानी 21-13, 21-19);

गट अ: सैनुमेरो जालन गोशॉक वि.वि.रावेतकर कॉमेट्स 5-1(गोल्डन खुला दुहेरी 1: मकरंद चितळे/योहान खिंवसरा वि.वि.अमोल दामले/सुधांशु मेडसीकर 21-00, 21-00; गोल्डन खुला दुहेरी 2: मिहीर विंझे/सिद्धार्थ निवसरकर वि.वि.पराग चोपडा/सिद्धार्थ साठे 21-09, 17-21, 15-13; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: अमर श्रॉफ/सारा ठाकोर पराभुत वि.आदित्य पावनगडकर/आदिती रोडे 20-21, 11-21; सिल्व्हर खुला दुहेरी 3: अनिकेत सहस्त्रबुद्धे/तुषार मेंगळे वि.वि.अतुल ठोंबरे/प्रीती फडके 21-14, 21-08; सिल्व्हर खुला दुहेरी 4: हरीश अय्यर/समीर जालन वि.वि.सिद्धांत खिंवसरा/यश मेहेंदळे 19-21, 21-18, 15-10; वाईजमन खुला दुहेरी: अविनाश दोशी/गिरीश खिंवसरा वि.वि.बाळ कुलकर्णी/देवेंद्र राठी 21-14, 21-19);

गट अ: ऍकच्युअल फिनिक्स वि.वि.ईगल्स 4-3(गोल्डन खुला दुहेरी 1: अजिंक्य मुठे/प्रतीक धर्माधिकारी वि.वि.अमित देवधर/निलेश केळकर 21-19, 21-19; गोल्डन खुला दुहेरी 2: गंधार देशपांडे/कर्ना मेहता पराभुत बिपीन चोभे/बिपिन देव 12-21, 09-21; गोल्डन मिश्र खुला दुहेरी: तन्मय चोभे/सारा नवरे वि.वि.संग्राम पाटील/ईशा साठे 21-11, 21-10; सिल्व्हर खुला दुहेरी 3: अक्षय कश्यप/नीरज दांडेकर वि.वि.हेमंत पालांडे/पार्थ केळकर 21-11, 21-08; सिल्व्हर खुला दुहेरी 4: अनुज मेहता/सुदर्शन बिहानी पराभुत वि.चिन्मय चिरपुटकर/इरा आपटे 20-21, 20-21; वाईजमन खुला दुहेरी: कौस्तुभ वाळिंबे/राहुल गांगल पराभुत वि.मंदार विंझे/प्रशांत वैद्य 10-21, 04-21; टायब्रेकर: तन्मय चोभे/सारा नवरे वि.वि.बिपिन चोभे/बिपिन देव 21-13, 21-16).

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अल्टीमेट खो खो लीगमधील अनुभव युवा खेळाडूंना देणार-दुर्वेश साळुंखे
नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, लौसान डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा ठरला पहिलाच इंडियन
आशिया कपची सुरुवातच वादाने! लंकेचे खेळाडू-समर्थक प्रचंड भडकले, नेमकं काय झालं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---