मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध नांदेड चांबल चॅलेंजर्स यांच्यात महत्वपूर्ण लढत झाली. नांदेड संघ 21 गुणांसह चौथ्या स्थानी होता हा सामना जिंकून दुसऱ्या स्थानासाठी आपली दावेदारी करणार होता. तर मुंबई उपनगर संघ टॉप 2 च्या शर्यतीतुन बाहेर पडल्याने त्याना क्वालीफायर 1 किंवा 2 खेळावा लागणार होत. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांना 1-1 गुण मिळत खात उघडला.
पहिल्या पाच मिनिटांच्या खेळानंतर सामना 5-5 असा बरोबरीत सुरू होता. त्यानंतर मात्र अजित चव्हाण च्या आक्रमक चढाया आणि अभिषेक बोरुडे च्या पकडीनी नांदेड संघाने मुंबई उपनगर संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली. मध्यंतराला 23-17 अशी आघाडी नांदेड संघाकडे होती. मध्यांतरा नंतर नांदेड संघाच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ सुरूच ठेवला. नांदेड कडून अजित चव्हाण सुपर टेन केला तर ऋषिकेश भोजने हाय फाय केला.
नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाने 47-27 असा विजय मिळवत दुसऱ्या स्थानी झेप घेतली मात्र स्थान निश्चित झाला नाही. आजच्या शेवटच्या सामन्यात कोल्हापूर विरुद्ध नाशिक सामन्या नंतरच समजेल की दुसऱ्या स्थानावर कोणता संघ असेल. नांदेड कडून अजित चव्हाण ने 17 गुण मिळवले तर कर्णधार ऋषिकेश भोजने ने पकडीत 7 गुण मिळवले. मुंबई उपनगर कडून यश डोंगरे ने 7 गुण मिळवले. (Fourth win for Nanded Chambal Challengers, stay in the race for second place)
बेस्ट रेडर- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
बेस्ट डिफेंडर- ऋषिकेश भोजने, नांदेड चांबल चॅलेंजर्स
कबड्डी का कमाल- अजित चव्हाण, नांदेड चांबल चॅलेंजर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रमोशन फेरीत मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा चौथा विजय
के.एम.पी. युवा कबड्डी सिरीज च्या अंतिम फेरी पर्यंतचा असा असेल प्रवास