रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला.
या विजेतेपदा बरोबरच फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिअर डेसचॅम्प यांनी जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबोर आणि ब्राझीलच्या मारिओ झाग्गालो या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
फिफा विश्वचषकात खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणुन विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणारे डिडिअर डेसचॅम्प तिसरे व्यक्ती ठरले.
१९९८ च्या फिफा विश्वचषकात फ्रांसचे कर्णधार भूषवलेल्या डिडिअर डेसचॅम्प यांनी फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
तर २०१८ च्या फिफा विश्वचषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या फ्रान्स संघाचे डिडिअर डेसचॅम्प प्रशिक्षक आहेत.
या विजयाबरोबर फ्रान्सने फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा आपले नाव कोरले.
यापूर्वी फ्रान्सने १९९८ साली फिफा विश्वचषकाचे प्रथम विजेतेपद मिळवले होते. तर २००६ साली फ्रान्स इटलीकडून अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.
3 – Didier Deschamps has become the third person to win the World Cup as a player and as manager after Mario Zagallo and Franz Beckenbauer. Champion.#WorldCupFinal #WorldCup #FRA #CRO pic.twitter.com/H3zrhkx9rO
— OptaJoe (@OptaJoe) July 15, 2018
डिडिअर डेसचॅम्प यांनी १९८९ ते २००० या काळात फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे १०३ सामन्यात प्रतिनिधित्व केले. या १०३ सामन्यात डिडिअर डेसचॅम्प यांनी चार गोल नोंदवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक २०१८: फान्सने पटकावले दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद
-फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार