नवी दिल्ली। आयपीएल फ्रंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांचा असा विश्वास आहे की, आयपीएलच्या टायटल प्रायोजकाबद्दल चर्चा करण्याऐवजी स्पर्धेदरम्यान कोविड-१९ व्हायरसचे एकही प्रकरण समोर आले नाही पाहिजे, यावर लक्ष दिले पाहिजे.
एका चूकीमुळे सर्व नष्ट होईल
वाडिया यांनी बुधवारी (५ ऑगस्ट) संघमालकांच्या झालेल्या बैठकीत पीटीआयशी बोलताना म्हटले, “आम्हाला (संघ मालक) केवळ एक गोष्ट माहीत आहे ती म्हणजे, आयपीएलचे आयोजन होत आहे. आम्ही खेळाडू आणि यांमध्ये सामील होणाऱ्या इतर लोकांच्या सुरक्षेबाबत खूप चिंतेत आहोत. जर कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण समोर आले, तर आयपीएल नष्ट होऊ शकते.”
ते पुढे म्हणाले, जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमीनंतर आयपीएल हळूहळू चीनी प्रायोजकावरून बाजूला झाले पाहिजे. जर गरज पडली, तर चीनी कंपन्यांची जागा घेण्यासाठी बरेच प्रायोजक आहेत.
आयपीएलला यशस्वी करणे प्रायोजकांचे काम
सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाडिया यांना अपेक्षा आहे की प्रायोजक जोडण्यासाठी खूप मेहनत घेतील. मग ते संघ प्रायोजक असो किंवा आयपीएल प्रायोजक. ते म्हणाले, “सर्व प्रायोजक खूप मेहनत घेतील. परंतु हा आयपीएल सर्वाधिक पाहिला जाईल, असा मला विश्वास आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या. जर यावर्षी प्रायोजक आयपीएलचा भाग नसतील, तर ते मूर्खपणाचे ठरेल.”
बीसीसीआयने संघांना १६ पानांची मानक प्रणाली प्रक्रिया पाठविली आहे. जेणेकरून स्पर्धेचे आयोजन चांगल्याप्रकारे होईल. यामध्ये खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संघ अधिकारी आणि मालकांना जैव- सुरक्षित वातावरणात राहावे लागेल. वाडिया यांनी आयपीएलसाठी यूएई जाण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु त्यांनी म्हटले आहे की सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
-५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
-क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
-या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत