टी२० क्रिकेटच्या इतिहासात २६ ऑगस्टला एक मोठा विक्रम झाला आहे. यापूर्वी कोणत्याच गोलंदाजाने टी२० क्रिकेटमध्ये असा विक्रम केलेला नाही. नेदरलँडची २१ वर्षीय गोलंदाज फ्रेडरिक ओवरडिकने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ विकेट घेत विश्वविक्रम रचला आहे. आयसीसीद्वारे आयोजित यूरोपीय टी २० विश्वचषकाच्या काॅलिफायर फेरीतील एका सामन्यात हा इतिहास घडला आहे. नेदरलँँडने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.
नेदरलँड आणि फ्रान्समध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात फ्रान्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण संघ ३३ धावा बनवून १७.३ षटकांत सर्वबाद झाला. संघातील एकही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. संघाला सर्वात जास्त १४ धावा अतिरिक्तच्या रूपात मिळाल्या. फ्रेडरिक ओवरडिकने सामन्यातील तिच्या ४ षटकांपैकी २ षटकात एकही धाव दिली नाही. तिने टाकलेल्या षटकात केवळ ३ धावा दिल्या आणि ७ विकेट्स घेतल्या.
याआधी पुरुष आणि महिला या दोन्ही प्रकांरांमध्ये ६ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम आहे. ओवरडिकने सामन्यात ६ फलंदाजांना त्रिफळाचीत केले आहे. हा तिचा ८ वा टी २० आंतरराष्ट्रीय सामना आहे. याआधीच्या ७ सामन्यात तिने केवळ ४ विकेट घेतल्या होत्या.
नेदरलँडच्या संघाने ३४ धावांचे लक्ष्य ३.३ षटकांत केवळ १ विकेट गमावत गाठले. म्हणजेच संघाने केवळ २१ चेंडूत आणि संघाच्या ९ विकेट्स राखून सामना जिंकला. सामन्यातील ९९ चेंडू फेकायचे बाकी होते.
World Record figures!
Frederique Overdijk yesterday became the first player to take seven wickets in a T20I 🙌
More on the fast bowler’s dream day: https://t.co/Vf39vHZKXN pic.twitter.com/FUbTfs32S0
— ICC (@ICC) August 27, 2021
फ्रेडरिक ओवरडिकच्या आधी टी२० मध्ये नेपाळच्या अंजली चंदच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाचा विक्रम होता. तिने २०१९ च्या डिसेंबरमध्ये मालदिवविरुद्ध २.१ षटकात एकही धाव न देता ६ विकेट घेतल्या होत्या. भारतासाठी महिलांच्या एका टी२० सामन्यात सर्वेत्कृष्ट प्रदर्शनाचा विक्रम झूलन गोस्वामीच्या नावावर आहे. वेगवान गोलंदाज झूलनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावा देत ५ विकेट्स मिळवल्या होत्या.
तसेच पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शनाचा विक्रम भारताच्या दीपक चाहरच्या नावावर आहे. त्याने नागपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध टी२० सामन्यांत ७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“कृपया अफगाणांना मारणे थांबवा,” राशिद खानची आर्त हाक
आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, ४६ चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे आंगलट आले का? पंतने दिले उत्तर