जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल हा ‘लाल मातीचा बादशहा’ या नावाने ओळखला जातो. तो त्याच्या नावाला साजेश्या वस्तूही परिधान करतो. फ्रेंच ओपन 2020 टेनिस स्पर्धेच्या एका सामन्यात त्याने एक घड्याळ परिधान केले होते. टेनिस कोर्टमध्ये घातलेले आतापर्यंतचे हे सर्वात महागडे घड्याळ आहे. या घड्याळीची किंमत तब्बल 7.3 कोटी रुपये इतकी आहे.
घड्याळ कस्टम मेड असून ते रिचर्ड मिल या कंपनीचे आहे. काळ आवरण, केशरी डायल आणि निळा पट्टा असलेल्या या घड्याळाचे वजन 30 ग्रॅम इतके आहे आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूपासून हे घड्याळ तयार करण्यात आले आहे. टेनिस रॅकेटच्या स्ट्रिंग पॅटर्नचा लुक देण्यासाठी या घड्याळामध्ये स्टीलच्या वायरचा वापर करण्यात आला आहे. कंपनीने असे मर्यादित 50 घड्याळे बनविली आहेत.
या घड्याळीची किंमत पाहून सामान्य लोकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असेल.
नदाल सध्या फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहचला असून त्याचा हा सामना ६ ऑक्टोबरला जॅनिक सिन्नर विरुद्ध होणार आहे.