फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात रोमानियाच्या सिमोना हालेपने वेनेझुयएलाच्या गार्बी मुगुरूझाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
यापूर्वी हालेपने 2014 आणि 2017 मधे फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण दोन्ही वेळी तीच्या पदरी निराशा पडली होती. तीला अनुक्रमे मारिया शारापोव्हा आणि जेलेना ओस्टापेनको यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.
काल झालेल्या पहिल्या सामन्यात सिमोना हालेपने गार्बी मुगुरूझाचा 6-1, 6-4 असा पराभव केला. मुगुरूझा 2016 फ्रेंच ओपनची विजेती आहे.
येत्या शनिवारी होणारा अंतिम सामना गेल्या पाच ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धेतील हालेपचा तिसरा अंतिम सामना असेल.
महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात यूएस ओपन विजेती स्लोने स्टिफन्सने मॅडीसन कीचा पराभव करत पहिल्यांदा फ्रेंच ओपची अंतिम फेरी गाठली. स्लोने स्टिफन्सने मॅडीसन की ला 6-4, 6-4 असे सरळ सेटमधे पराभूत केले.
सप्टेंबर २०१७मध्ये झालेल्या यूएस ओपन स्पर्धेत स्लोने स्टिफन्सने मॅडीसन की धूळ चारत पहिल्यांदाच यूएस ओपनचे विजेचेपद मिळवले होते.
शनिवारी होणाऱ्या महिला ऐकेरीच्या अंतिम सामन्या सिमोना हालेप आणि स्लोने स्टिफन्स आपल्या पहिल्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लढतील.