जगात क्रिकेट हा फुटबॉलनंतर सर्वाधिक लोकप्रिय समजला जाणारा खेळ आहे. फुटबॉलचे देशांतर्गत मोसम वर्षभर चालू असतात तर विश्वचषक ४ वर्षातून एकदा खेळला जातो. फुटबॉल हा एकाच प्रकारांमध्ये जगभरात खेळला जातो तर क्रिकेट हा टी २० क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट या तीन प्रकारामध्ये खेळ जातो. भारतातील काही क्रीडा जाणकारांचे नेहमीच असे म्हणणे राहिले आहे की भारतात क्रिकेट बाकी खेळांना मारतोय. याचा अर्थ म्हणजे क्रिकेटमुळे दुसऱ्या खेळांना प्राधान्य मिळत नाही. क्रिकेटचा जगभर प्रचारा होण्यामागचा एक महत्वाचा पैलू म्हणजे आयसीसी म्हणजेच आंतररराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल होय.
आयसीसीने क्रिकेटच्या प्रचारासाठी नवनवीन प्रयत्न केले आहेत. ज्यामधूनच टी २० क्रिकेटचा जन्म झाला आहे. आयसीसी स्वतःच्या नावावर वेगवेगळ्या स्पर्धाही घेत असते जेणेकरून क्रिकेटचा प्रचार प्रसार होईल. आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक दर ४ वर्षांनी असतो तर टी २० विश्वचषक तर २ वर्षांनी असतो आणि चॅम्पियन्स ट्रॉफी नावाची स्पर्धा ८ टॉप संघांना घेऊन आयसीसी दर २ वर्षांनी घेत असते. आता आयसीसीने नकळतच एक नवा विक्रम केला आहे, तो म्हणजे सलग ९ वर्ष आयसीसीने स्पर्धा घेण्याचा. २००९ ते २०१७ या सर्व वर्षांमध्ये एकदातरी आयसीसी स्पर्धा क्रिकेट रसिकांना बघायला मिळाली आहे.
साल – स्पर्धा
२००९ – टी २० विषवचशक
ठिकाण : इंग्लंड
विजेते : पाकिस्तान
उपविजेता : श्रीलंका
२०१० – टी २० विषवचशक
ठिकाण : वेस्ट इंडिज
विजेते : इंग्लंड
उपविजेते : ऑस्ट्रेलिया
२०११- विषवचशक
ठिकाण : भारत
विजेते : भारत
उपविजेते : श्रीलंका
२०१२ – टी २० विषवचशक
ठिकाण : श्रीलंका
विजेते : वेस्ट इंडिज
उपविजेते : श्रीलंका
२०१३ – चॅम्पियन्स ट्रॉफी
ठिकाण : इंग्लंड
विजेते : भारत
उपविजेते : इंग्लंड
२०१४ – टी २० विषवचशक
ठिकाण : बांग्लादेश
विजेते : श्रीलंका
उपविजेते : भारत
२०१५ – विषवचशक
ठिकाण : ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलँड
विजेते : ऑस्ट्रेलिया
उपविजेते : न्यूझीलँड
२०१६ – टी २० विषवचशक
ठिकाण : भारत
विजेते : वेस्ट इंडिज
उपविजेते : इंग्लंड
२०१७ – चॅम्पियन्स ट्रॉफी