---Advertisement---

वर्ल्डकप फायनल मास्टर्स! हिलीचे मॅरेथॉन दीडशतक; गिलख्रिस्ट, पाँटिंग, रिचर्ड्ससारख्या पुरुषांवर वरचढ

Alyssa-Healy
---Advertisement---

आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये रविवारी (३ एप्रिल) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा खेळताना ऑस्ट्रेलियाने ३५६ धावा केल्या. या सामन्यात एलिसी हीलीने सर्वाधिक १७० धावा केल्या. अशी कामगिरी करत तिने अनेक विक्रम केले आहेत.

हीलीने (Alyssa Healy) १३८ चेंडूत २६ चौकारांच्या मदतीने १७० धावा केल्या. ही धावसंख्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील केलेली सर्वात्तम धावसंख्या आहे. हीलीने पुरुष किंवा महिला विश्वचषकात नवा विक्रम केला आहे. तिच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक-फलंदाज एडम गिलक्रिस्टने २००७च्या विश्वचषकात १४९ धावा केल्या आहेत. रिकी पाॅटिंगने २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १४० धावा केल्या आहेत आणि विव रिचर्ड्सने १९७९ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १३८ धावा केल्या आहेत. तिने या तिनही खेळाडूंचा विक्रम मोडत प्रथम क्रमांक गाठला आहे.

हीलीने यंदाच्या महिला विश्वचषकात एकूण ५०९ धावा केल्या आहेत. तिने अंतिम सामन्याबरोबरच उपांत्य फेरीत सुद्धा शतक ठोकले आहे. या ३२ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने ५६.५५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षक म्हणून ४ झेल घेतले आहेत आणि ४ यष्टीचीत केले आहेत. हीलीला या विश्वचषकाची सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. तिला सामनावीर म्हणून सुद्धा गौरवण्यात आले.

एलिसी हीलीसोबत सलामीवीर राचेल हेन्सने ९३ चेंडूत ६८ धावा केल्या. हिलीने पहिल्या विकेटसाठी हेन्ससोबत १६० तर बेथ मूनीसोबत १५६ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्स गमावत ३५६ धावा केल्या. इंग्लंकडून नतालिया साइवरने १२१ चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १४८ धावा केल्या. तिच्याशिवाय संघातील कोणतीच खेळाडू ३० धावांहून अधिक खेळी खेळू शकली नाही. त्यामुळे संघाला अपयशाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

CWC 2022 | ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेते, पाहा महिला विश्वचषकाचे आजपर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ

सीएसकेविरुद्ध धवनची बॅट आग ओकणार! ‘रनमशीन’ला मागे टाकत ‘बड्या’ विक्रमात सर्वांवर सरस ठरणार

Video: लाईव्ह शोमध्ये प्रीती झिंटाचे नाव घेताच भडकला इरफान पठाण अन् रैना झाला एप्रिल फूल प्रँकचा शिकार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---