भारताच्या हॉकी, बॅडमिंटन खेळाडूंनी 2022 वर्षात यशाची नवनवी शिखरे गाठली. भारतासाठी 2021 वर्ष टोकियो ऑलिंपिकमुळे तर यशस्वी ठरलेच, पण 2022 वर्षही तेवढेच खास राहिले. यामध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी त्यांच्या प्रकारांमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत सविस्तर माहिती घेऊ.
नीरज चोप्राची क्लासिक कामगिरी- ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने 2022मध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राखले. भारताच्या या स्टार भालाफेकपटूने यावर्षी जागतिक स्पर्धा गाजवली. त्याने ओरेगॉन येथे झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकले. भारताचे हे या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरेच आणि भालाफेकीतील पहिलेच पदक ठरले. नीरजच्या आधी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये उंच उडीत कांस्यपदक जिंकले होते. दुखापतीमुळे बर्मिंघम 2022च्या कॉमनवेल्थ गेम्सला मुकणाऱ्या नीरजने डायमंड लीगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने 89.94 मीटरचा भाला फेकत ही लीग जिंकली. ही लीग जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
बर्मिंघमच्या कॉमनवेल्थ गेम्समधील काही विशेष कामगिरी– 2022च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये शूटींग नव्हते तरीही भारताने यामध्ये असंख्य पदके जिंकला. भारताच्या अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत ही स्पर्धा गाजवली आहे. यामुळे शूटींग नसली तरी भारताच्या खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले नाही. भारताच्या वेटलिफ्टर, बॉक्सर्स, बॅडमिंटन या खेळाडूंनी खास कामगिरी करत पदकांची कमाई केली. स्पर्धेतील या हंगामात भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली.
लॉन बॉल्समध्ये भारताच्या महिला संघाने सुवर्ण आणि पुरुष संघाने रौप्य जिंकले. हे विशेष कारण भारताने कधीच या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. मुरली श्रीशंकर याने भारतासाठी पुरुषांच्या लांब उडीत पहिले रौप्यपदक जिंकले. अविनाश साबळे याने 3000 मीटरच्या स्टीपलचेजमध्ये रौप्य जिंकले आणि नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्याचे हे पदक विशेष कारण 1994 पासून या प्रकारात केवळ केनियाच पदके जिंकत आला होता, मात्र 2022मध्ये अविनाशने त्याला धक्का दिला. त्याचबरोबर बर्मिंघममध्ये भारताच्या महिला हॉकी आणि क्रिकेट संघानीही पदकांची कमाई केली.
एचएस प्रणॉयमुळे भारताने पहिल्यांदा जिंकला थॉमस कप – 2022मध्ये थॉमस कप बॅंकॉक, थायलंडमध्ये पार पडला. त्यामध्ये भारताच्या बॅडमिंटन संघाचे नेतृत्व लक्ष्य सेन करत होता. त्यामध्ये एचएस प्रणॉय, किदंबी श्रीकांत आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धेत भारताला पाचवे मानांकन होते. एचएस प्रणॉय याने उपांत्यपूर्ण आणि उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने 14 वेळचा चॅम्पियन इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव करत पहिल्यांदा थॉमस कप जिंकण्याची कामगिरी केली.
बॉक्सर निखत झरिनसाठी 2022 सुवर्णमय – भारतीय बॉक्सर निखत झरिन हिला कॉमनवेल्थ गेम्सची कसर जागतिक स्पर्धेत भरून काडली. या भारतीय बॉक्सरचे कॉमनवेल्थचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले, मात्र जागतिक चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले. ती एमसी मेरी कोम, लैश्राम सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा केसी या खेळाडूंनंतर विजेतेपद पटकावणारी सहावी भारतीय महिला ठरली. निखतने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022च्या अंतिम फेरीत थायलंडच्या जुतामास जितपॉन्ग या टोकियो ऑलिम्पिक विजेतीचा 5-0 असा पराभव केला. याशिवाय, परदेशात वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी मेरी कोम नंतरची ती पहिली भारतीय ठरली.
भारतीय महिला हॉकी- हॉकीसाठी 2021 आणि 2022 वर्ष खास ठरले. यावर्षी भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच झालेल्या एफआयएच नेशन कप जिंकण्याची कामगिरी केली. या स्पर्धेतून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांनी कोरोनामुळे माघार घेतली होती. आठ संघांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सविता पुनिया हिच्या नेतृत्वाखालील भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले. त्यानंतर आयर्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करत अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात स्पेनला 1-0 असे पराभूत केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुड बाय 2022 | क्रिकेटच्या मैदानात यावर्षी सर्वाधिक गाजलेले 6 वाद, यादीत दग्गजांचा समावेश
ही कुठली पद्धत? अपघातानंतर पंतचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर भडकली रोहितची पत्नी