बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादल आले आहे. या वादळामुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातही तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरातील दैनंदिन जीवन पूर्णपणे थांबले आहे. शहरातील रस्ते आणि इमारिती अक्षरशः पावसामुळे कोसळल्या आहेत. भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. अश्वनसह इतरही काही क्रिकेटपटूंनी वादळात अडकलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे.
मिचौंग चक्रिवादळाने तमिळनाडूनत कहर केला आहेत. राजधानी चेन्नईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पाऊस आणि वेगाच्या वाऱ्यांमुळे बंद केले गेले आहे. तसेच इथर सर्व प्रकारचे ट्रान्सपोर्ट देखील बंद पडले आहेत. लोकांना घरातून बाहेर पडता येत नाहीये. हे वादळ शेवटी शेवटी अधिक घातक होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. पण त्याआधीच चेन्नई शहराची अवस्था बिकट झाली आहे. चेन्नई शहर या अडचणीत असताना भारतीय संघाचे क्रिकेटपटू प्रार्थना करत आहेत.
रविचंद्रन अश्विन याने अपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ट्वीट केले. चक्रिवादळामुळे होत असलेले नुकसान अश्विनच्या या पोस्टमधून स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओत रोजच्या आयुष्यात लोकांसाठी महत्वाचा असणारा एक रस्त खचताना दिसत आहेत. तसेच रत्यासोबत त्याठिकाणी असणारी वाहणे देखील खड्ड्यात जाताना दिसत आहेत. कॅप्शनमध्ये अश्विनने लिहिले की, “सर्वांनी अजून एक दिवस थांबा. पाऊस धांबला तरी त्यामुळे होणारे नुकसान थांबण्यासाठी वेळ लागेल.”
Hang tight for another day everyone????
Even if the rain stops, recovery is going to take a while. #ChennaiRains2023 #Michaung pic.twitter.com/QsnkuxuXx3— Ashwin ???????? (@ashwinravi99) December 4, 2023
अश्विनसोबतच गोलंदाजी अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर () यानेही चेन्नईतील रहिवास्यांना सुरक्षित राहण्याची विनंती केली आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये ट्वीट सुंदरने केले आणि आपण या अडचणीतून लवकरच बाहेर पडू असा विश्वास दिला आहे.
To people of Chennai, Please stay safe and indoor guys ???? We will get through this ???? #CycloneMichaung https://t.co/PZPOiy7dAY
— Washington Sundar (@Sundarwashi5) December 4, 2023
भारतीय संघाचे मागी दिग्गज अनिल कुंबळे आणि मराठमोळा अजिंक्य रहाणे यानेही चेन्नईतील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना केल्या आहेत. तसेच प्रत्यक्ष पुरात उतरून लोकांची मदत करणाऱ्या सर्वांचे रहाणे आणि कुंबळे यांनी आभार देखील मानले.
Hoping for everyone’s safety in Chennai. Huge thanks to all the frontline workers for their bravery in this hour of need.#CycloneMichuang
— Anil Kumble (@anilkumble1074) December 4, 2023
Wishing for the safety of everyone in Chennai and extending my gratitude to everyone working at ground zero! ????
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 4, 2023
याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानेही चेन्नईत अडकून पडलेल्यांसाठी खास पोस्ट केली आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून वॉर्नरने ही पोस्ट शेअर केली.
View this post on Instagram
(From Ravichandran Ashwin to Ajinkya Rahane, cricketers pray for cyclone victims in Chennai)
महत्वाच्या बातम्या –
‘इथे खेळाडूंना सिलेक्ट नाही, रिजेक्ट करतात, ही भारतीय क्रिकेटची…’, इशान किशनविषयी दिग्गजाचे मोठे विधान
अवघ्या 23व्या वर्षी बोहल्यावर चढला आफ्रिकन गोलंदाज, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच थाटला संसार; पाहा Photos