---Advertisement---

आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ फलंदाजांनी जिंकलीय ऑरेंज कॅप, ‘हा’ धुरंधर विक्रमतोड ४ वेळा ठरलाय मानकरी

On: शनिवार, सप्टेंबर 18, 2021 11:32 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होण्यासाठी केवळ एका दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. १९ सप्टेंबर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील दुबई येथे होणाऱ्या हाय वोल्टेज सामन्याने उर्वरित हंगामाचा शुभारंभ होणार आहे. युएई टप्प्यात आयपीएलचे एकूण ३१ सामने होणार असून फलंदाजांपासून ते अगदी यष्टीरक्षकांपर्यंत सर्वांचे लक्ष्य प्रभावी प्रदर्शन करत आपल्या संघाचा जेतेपद मिळवून देण्याकडे असेल.

आतापर्यंत भारतात झालेल्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक ३८० धावा करत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवने ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर सजवली आहे. दूसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा गोलंदाज हर्षल पटेल १७ विकेट्ससह पर्पल कॅपचा मानकरी आहे. परंतु उर्वरित हंगामाची सुरुवात झाल्यानंतर या कॅप इतर खेळाडूंच्या डोक्यावरही सजू शकतात. त्यामुळे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचा खरा विजेता हंगामाच्या शेवटीच कळेल.

तत्पूर्वी आम्ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात दर हंगामात गोलंदाजांचा घाम काढत ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी येथे तुमच्या माहितीसाठी दिली आहे.

आयपीएलच्या आजवरच्या १३ हंगामांच्या इतिहासात ४ भारतीय क्रिकेटपटू या कॅपचे मानकरी बनले आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्सचा माजी शिलेदार सचिन तेंडूलकर, सध्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये असलेला रॉबिन उथप्पा, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि पंजाब किंग्जचा संघनायक केएल राहुल यांचा समावेश आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा धुरंधर डेविड वॉर्नरने विक्रमतोड ४ वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २ वेळासुद्धा ही कॅप जिंकता आलेली नाही.

२००८ ते २०२० पर्यंतच्या ऑरेंज कॅप विजेत्यांची यादी
शॉन मार्श, ६१६ धावा- २००८
मॅथ्यू हेडन, ५७२ धावा- २००९
सचिन तेंडूलकर, ६१८ धावा- २०१०
ख्रिस गेल, ६०८ धावा- २०११
डेविड वॉर्नर, ७३३ धावा- २०१२
माइकल हसी, ७३३ धावा- २०१३
रॉबिन उथप्पा, ६६० धावा- २०१४
डेविड वॉर्नर, ५६२ धावा- २०१५
विराट कोहली, ९७३ धावा- २०१६
डेविड वॉर्नर, ६४१ धावा- २०१७
केन विलियम्सन, ७३५ धावा- २०१८
डेविड वॉर्नर, ६९२ धावा- २०१९
केएल राहुल, ६७० धावा- २०२०

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल: २००८-२०२०, ‘या’ मातब्बर गोलंदाजांनी जिंकलीय पर्पल कॅप; एक भारतीय सलग २ वर्षे ठरलाय मानकरी

आयपीएलच्या उत्तरार्धात लागणार विक्रमांची रास, पाच भारतीयांसह पोलार्ड-मॉरिस ठोकणार ‘अनोखे’ शतक?

‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---