महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात येतो. काल(18 फेब्रुवारी) 2018-19 या वर्षाच्या पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहेत.
2018-19 या वर्षासाठी 48 खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये 23 पुरुष खेळाडूंचा आणि 25 महिला खेळाडूंचा समावेश आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा 22 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथे संध्याकाळी 5 वाजता पार पडेल. यावेळी विजेत्या खेळाडूंचा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
पुरस्कार विजेत्या खेळाडूंमध्ये कुस्तीपटू अभिजित कटके, कबड्डीपटू रिशांक देवाडिगा, गिरिष एर्नाक, सोनाली शिंगटे यांचा समावेश आहे.
याबरोबरच कुस्तीमध्ये मोठे योगदान देणाऱ्या पंढरीनाथ तथा आण्णासाहेब पठारे यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त 5 जणांना सर्वोत्तम क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार मिळणार आहे.
यामध्ये युवराज खटके, सांगली (ऍथलेटिक्स), बाळासाहेब आवारे, बीड (कुस्ती), नितीन खत्री, पुणे (तायक्योंदो), जगदीश नानजकर, पुणे (खो-खो), अनिल पोवार, कोल्हापूर (पॅरा ऍथलेटिक्स) या क्रीडा प्रशिक्षकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर काल पॅरा ऍथलीट आणि साहसी खेळ या विभागाच्याही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहसी खेळ प्रकारात 4 जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात प्रभात कोळी, मुंबई (खाडी पोहणे), शुभम वनमाळी, ठाणे (खाडी पोहणे), अर्पणा प्रभूदेसाई, पुणे (गिर्यारोहण) आणि सागर बडवे, औरंगाबाद यांचा समावेश आहे.
पॅरा ऍथलीट प्रकारात तीन जणांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये स्वप्निल पाटील (जलतरण), पार्थ हेंद्रे (जलतरण), सायली पोहरे (जलतरण) यांचा समावेश आहे.
तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी २०२०च्या गुवाहाटी, आसाम येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे.
2018-19 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची यादी –
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)-
– खाे-खाे : हर्षद हातणकर (मुंबई), कविता घाणेकर (ठाणे),
– कबड्डी : रिशांक देवडिगा (मुंबई), गिरीश इरनाक (ठाणे), साेनाली शिंगटे (मुंबई शहर).
– सायकलिंग : अश्विन पाटील (भंडारा), मधुरा वायकर (मुंबई).
– आट्यापाट्या : पवन जयस्वाल (वाशीम), प्रिया गाेमासे (भंडारा).
– कुस्ती : अभिजित कटके (पुणे), अंकिता गुंड (पुणे),
– कयाकिंग-कनाेइंग : सुलतान देशमुख (नाशिक).
– व्हाॅलीबाॅल : प्रियंका खेडकर (पुणे),
– स्केटिंग : सिद्धांत कांबळे, साक्षी माधव (पुणे).
– वुशू : प्रियंका गाैडा (मुंबई शहर),
– जलतरण : हर्षल वखारिया (पुणे), सिद्धार्थ परदेशी (नाशिक), अवंतिका (मुंबई), मानसी गावडे (रायगड).
– तिरंदाजी : सुकमनी बाबरेकर (अमरावती).
-ऍथलेटिक्स : किसन तडवी (नाशिक), अर्चना अढाव ( पुणे).
– बास्केटबाॅल : श्रुती अरविंद (पुणे).
– साॅफ्टबाॅल : अंबुलकर (नागपूर), गाेतमारे (अमरावती).
-जिम्नॅस्टिक : गाैरव जाेगदंड (औरंगाबाद), श्रावणी राऊत (ठाणे).
-नेमबाजी : वेदांगी तुळजापूरकर (मुंबई).
– तलवारबाजी : तुषार आहेर (औरंगाबाद), दामिनी राभांड (नागपूर).
-बाॅक्सिंग : अनंता चाेपडे (अकाेला).
– राेइंग : सूर्यभान घाेलप, जागृती शहारे (नाशिक).
-तायक्वांदाे : नीरज चाैधरी (धुळे), भावे (पुणे).
– बॅडमिंटन : देवळेकर (ठाणे), संयाेगिता घाेरपडे (पुणे).
-मल्लखांब : गणेश शिंदे , हिमानी परब (मुंबई).
– शरीरसाैष्ठव : याेगेश (पालघर), करुणा वाघमारे (मुंबई).
-हाॅकी : आकाश चिकटे (यवतमाळ).
– याॅचिंग : श्वेता शेरवेगार.
– बेसबाॅल : गिरिजा बेडेकर (काेल्हापुर).
-पाॅवरलिफ्टिंग : नीलेश गराटे, साेनाली (मुंबई).
न्यूझीलंडचा हा मोठा खेळाडू पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता…
वाचा- 👉https://t.co/mvGvqpEGOv👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
हा खेळाडू म्हणतो,' …तर मी २०२३ विश्वचषक खेळण्यास तयार'
वाचा- 👉https://t.co/6fDPJtxLNl👈#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020