१७ वर्षाखालील फुटबॉल विश्वचषकात प्रेक्षकांनी सर्व उपस्थितीचे विक्रम मोडत भारतात फुटबॉल बद्दल असलेले वेड दाखवून दिले होते पण फुटबॉल विश्वचषकाच्या उंबरठ्यावर भारतात होणाऱ्या आंतरखंडीय स्पर्धेकडे प्रेक्षकांनी तोंड फिरवले होते. त्याच्या काही कारणांमध्ये १ कारण होते कि त्याची योग्य अशी जाहिरात झाली नाही.
त्याचाच परिणाम म्हणून भारताच्या पहिल्या सामन्याला पाहायला प्रेक्षकांची हजेरी नव्हती. हा सामना भारताने ५-० ने जिंकला पण त्याची चर्चा सुद्धा नव्हती. यावरच उपाय म्हणून भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने सोशल मीडियावरून एक भावनिक आव्हान केले. युरोपियन क्लबला करतात तसाच आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही असे त्याचे म्हणणे होते. आणि त्याच्या या आव्हानाला सर्व क्रीडा प्रेमींनी साथ दिली.
This is nothing but a small plea from me to you. Take out a little time and give me a listen. pic.twitter.com/fcOA3qPH8i
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 2, 2018
मुंबईत झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्याला सुद्धा मैदान प्रेक्षकांनी पूर्ण भरले होते. तर आज झालेल्या न्यूझीलंड बरोबरचा सामना सुद्धा हाउसफुल होता. अंतिम सामन्यात अजून भारताचे स्थान पक्के झालेले नसतानासुद्धा अंतिम सामन्याचे तिकीट संपलेले आहेत.
पहिल्या सामन्यात चायनीज तापाईला ५-० तर दुसऱ्या सामन्यात केनियाला ३-० ने हरवत भारताने स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे अंतिम सामन्यातील संघ ठरायच्या आधीच तिकीट विकली गेली आहेत.
आजच्या सामन्यात मात्र भारताला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. न्युझीलंडने या सामन्यात आज भारतावर २-१ असा विजय मिळवला.
स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी १० जूनला रात्री ८ वाजता चालू होईल. सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स २ वर असेल.