इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. मागील या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल २०२१ चा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ९ एप्रिल रोजी गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. तर या हंगामाची अंतिम लढत ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
रोहित शर्मा कर्णधार असलेल्या मुंबईने मागीलवर्षी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला होता. त्यांनी आत्तापर्यंत २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० असे पाच वेळा आयपीएल जेतेपद मिळवले आहेत.
यावर्षी मुंबईच्या साखळी फेरीतील १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता होतील. तर उर्वरित ३ सामने दुपारी ३.३० वाजता सुरू होतील.
आयपीएलचा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मे या कालावधीत साखळी फेरीतील एकूण ५६ सामने पार पडतील. त्यानंतर २५ मे पासून प्लेऑफचे सामने सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळच्या सामन्यांना ७.३० वाजता प्रारंभ होईल.
Mark your calendars. #IPL2021 is here. ????
First challenge: #MIvRCB ⚔️#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/UXHFYtoJp0
— Mumbai Indians (@mipaltan) March 7, 2021
असे आहेत आयपीएल २०२१ मधील मुंबई इंडियन्सचे साखळी फेरीतील सामने –
९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१७ एप्रिल- चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
२० एप्रिल- चेन्नई, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ एप्रिल – चेन्नई, पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
१ मे – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
४ मे – दिल्ली, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, दुपारी ३.३० वाजता
१६ मे – बंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
मुंबई इंडियन्स – २५ खेळाडू (८ परदेशी)
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे (यष्टीरक्षक), किरोन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान, नेथन कुल्टर नाईल, ऍडम मिल्ने, पियुष चावला, जेम्स निशम, युधविर चरक, मार्को जेन्सन, अर्जुन तेंडूलकर
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूला ‘ते’ ट्विट पडले महागात, मिळाली जीवे मारण्याची धमकी
मालिकावीर ठरलेल्या आर अश्विनकडे पत्नीची खास मागणी; म्हणाली, ‘बायोबबल तोड आणि…’