---Advertisement---

नव्या कर्णधारासह राजस्थान दुसऱ्या जेतेपदावर लावणार मोहर? वाचा कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

On: सोमवार, मार्च 8, 2021 9:42 PM
---Advertisement---

बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रकही रविवारी (०७ मार्च) जाहीर करण्यात आले आहे. या हंगामातील पहिला सामना ९ एप्रिलपासून गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणार आहे. तर ३० मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे.

यावर्षी राजस्थान रॉयल्सने मोठा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आयपीएल २०२० मध्ये राजस्थानचे नेतृत्त्व करणाऱ्या स्टिव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन हटवत संजू सॅमसनवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. गतवर्षीच्या हंगामातील त्याची कामगिरी पाहता ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

राजस्थानने आयपीएलच्या सर्वात पहिल्या हंगामाचे अर्थात २००८ मध्ये विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर मात्र त्यांना आयपीएल चषक उंचावता आला नाही. त्यांना मागीलवर्षी प्लेऑफपर्यंतही पोहोचला आले नव्हते. तर २०१९ मध्येही साखळी फेरीनंतर सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अशात नव्या कर्णधार सॅमसनकडून राजस्थान संघाला फार अपेक्षा असणार आहे.

यावर्षीसाठी राजस्थानच्या संघात एकूण २४ खेळाडूंचा समावेश आहे. त्यातही ख्रिस मॉरिसला विक्रमतोड १६ कोटी २५ लाखांच्या किंमतीला विकत घेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच शिवम दुबे, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रेहमान, कुलदीप यादव अशा खेळाडूंचाही त्यांनी संघात समावेश केला आहे.

यावर्षी राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना १२ एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध मुंबई येथे होणार आहे. या हंगामातील त्यांच्या एकूण १४ सामन्यांपैकी ११ सामने रात्री ७.३० वाजता होणार आहेत, तर उर्वरित ३ सामने दुपारी ३.३० वाजता खेळवले जातील.

असे आहे आयपीएल 2020मधील राजस्थान रॉयल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-

१२ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१९ एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२२ एप्रिल – मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२४ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – दिल्ली, मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी ३.३० वाजता
२ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता
५ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – दिल्ली, राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
११ मे – कोलकाता, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१३ मे – कोलकाता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – कोलकाता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
१८ मे – बंगळुरू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२२ मे – बंगळुरू – पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता

राजस्थान रॉयल्स – २४ खेळाडू (८ परदेशी)

बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर, अँड्र्यू टाय, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाळ, मनन वोहरा, ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, चेतन साकारिया, मुश्तफिजुर रेहमान, लियाम लिविंगस्टोन, केसी कारिप्पा, आकाश सिंग, कुलदीप यादव

महत्त्वाच्या बातम्या-

‘विराटसेना’ पहिल्याच सामन्यात मुंबईकरांशी करणार दोन हात, जाणून घ्या आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक 

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचं यंदा बदलणार का नशीब? ‘असं’ आहे अय्यरच्या टीमचं पूर्ण वेळापत्रक

आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---