---Advertisement---

‘विराटसेना’ पहिल्याच सामन्यात मुंबईकरांशी करणार दोन हात, जाणून घ्या आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक 

---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचा चौदावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. बीसीसीआयने ०७ मार्च रोजी आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले होते. एप्रिल महिन्यात ९ तारखेपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. या हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबाद येथे होईल.

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघ पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग आहे. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये बेंगलोरने अंतिम फेरीत धडकही मारली होती. परंतु त्यांना तिन्हीवेळीही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षीही दमदार कामगिरीनंतर त्यांनी प्लेऑफपर्यंत मजल मारली होती.

मात्र इलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या हातून पराभूत झाल्याने त्यांना अंतिम सामन्यापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे विजयासाठी आसुललेला बेंगलोर संघ यंदा चषक जिंकण्यासाठी अथक परिश्रम करताना दिसेल.

यंदा सुरक्षेच्या कारणाने केवळ ६ शहरात आयपीएलचे आयोजन करण्यात आले आहे. या ६ शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश होतो.

तसेच साखळी फेरी दरम्यान प्रत्येक संघ ४ ठिकाणी सामने खेळणार आहे. यादरम्यान प्रत्येक संघाला केवळ ३ वेळाच प्रवास करावा लागणार आहे. जेणेकरुन कोरोना बाबातची जोखीम कमी होईल. एवढेच नाही तर यंदा कोणताही संघ घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही. प्रत्येक सामने तटस्थ मैदानांवर होणार आहेत.

आयपीएलचा हा चौदावा हंगाम यावर्षी ५१ दिवसांचा असणार आहे. ९ एप्रिल ते २३ मेपर्यंत या साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने २५ मेपासून सुरु होतील. तसेच यावर्षी आयपीएलमध्ये ११ डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील.

https://twitter.com/RCBTweets/status/1368491938085662721?s=20

असे आहेत आयपीएल २०२१ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे साखळी फेरीतील सामने-

९ एप्रिल – चेन्नई, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७० वाजता
१४ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल- चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२२ एप्रिल – मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२५ एप्रिल – मुंबई, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२७ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३० एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, संध्याकाळी ७.३० वाजता
६ मे – अहमदाबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
९ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता
१४ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१६ मे – कोलकाता, राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दुपारी ३.३० वाजता
२० मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२३ मे – कोलकाता, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – २२ खेळाडू (८ परदेशी)

विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पड्डीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, ऍडम झम्पा, शाहाबाज अहमद, जोश फिलिप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, हर्षल पटेल, डॅनिएल सॅम्स, काईल जेमिसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिस्तीन, सचिन बेबी, रजत पाटिदार, मोहम्मद अझरुद्दीन, सुयश प्रभुदेसाई, कोना श्रीकर भरत

महत्त्वाच्या बातम्या-

गतवर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सचं यंदा बदलणार का नशीब? ‘असं’ आहे अय्यरच्या टीमचं पूर्ण वेळापत्रक

आयपीएल २०२१: ‘ऑरेंज आर्मी’ची पहिली भिडंत केकेआरविरुद्ध, पाहा त्यांचे संपूर्ण वेळापत्रक

‘किंग खान’च्या केकेआरची नजर तिसऱ्या विजेतेपदावर; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---